लोकसत्ता खास प्रतिनिधी
मुंबईः कुर्ला येथे मिठी नदीमध्ये ४० वर्षीय व्यक्तीचा मृतदेह सापडला असून त्याप्रकरणी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे. मृतदेहाची ओळख अद्याप पटली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
आणखी वाचा- मुंबई: धमकी देऊन बलात्कार करणाऱ्या आरोपीला पकडण्यात यश
कुर्ला येथील कबरस्तानच्या मागे मिठी नदीच्या पाण्यात एक मृतदेह तरंगत असल्याचा दूरध्वनी बुधवारी मुंबई पोलिसांना आला होता. त्याबाबतची माहिती स्थानिक कुर्ला पोलिसांना दिल्यानंतर एक पथक घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलातील जवानांच्या मदतीने मिठी नदीतून मृतदेह बाहेर काढण्यात आला. त्यानंतर तात्काळ मृतदेह राजावाडी रुग्णालयात पाठविण्यात आला. याप्रकरणी कुर्ला पोलिसांनी अपमृत्युची नोंद केली आहे. मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नाही. मृत व्यक्ती सुमारे ४० वर्षांचा असल्याची अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.