कांदिवली येथे एका कर्णबधीर तरुणाने चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. विजय शिरसाठ (२१) असे या तरुणाचे नाव आहे. सोमवारी पहाटे पावणेचारच्या सुमारास ही घटना घडली
विजय कुटुंबियांसह कांदिवलीच्या हनुमान नगर येथे राहत होता. त्याचे वडील कांदिवलीच्या गुंदेचा औद्योगिक वसाहतीत सुरक्षा रक्षक आहेत. विजयसुद्धा वडिलांसोबत त्याच औद्योगिक वसाहतीत सुरक्षा रक्षकाचे काम करीत असे. सोमवारी पहाटे बाथरूमला जाण्याचे कारण सांगून तो बाहेर गेला. थोडय़ाच वेळात त्याने चौथ्या मजल्यावर जाऊन उडी मारली. विशेष म्हणजे त्याचे वडील जिथे होते तेथेच तो खाली पडला.
त्याला भगवती रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले पण तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले. त्याने आत्महत्येपूर्वी कुठलीही चिठ्ठी लिहिलेली नव्हती. त्याच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही.

Story img Loader