मुंबई : माटुंगा येथे क्रिकेट सामन्यादरम्यान डोक्याला चेंडू लागल्यामुळे ५२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. जयेश चुन्नालाल सावला (५२) असे मृत व्यक्तीचे नाव असून तो भाईंदर येथील रहिवासी आहे. याप्रकरणी माटुंगा पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

माटुंगा पूर्व येथील दडकर मैदानात सोमवारी कच्छी समाजाची क्रिकेट मालिका सुरू होती. त्यावेळी सामन्यादरम्यान सावला क्षेत्ररक्षण करीत होते. त्यावेळी बाजूच्या खेळपट्टीवर क्रिकेट सामना सुरू असताना फलंदाजाने टोलवलेला चेंडू डोक्याला लागल्यामुळे सावला खाली पडले. त्यांना तात्काळ लायन ताराचंद रुग्णालयात नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी तपासून सावला यांना मृत घोषित केले. ५० वर्षांवरील व्यक्तीसाठी हे सामने आयोजित करण्यात आले होते.

Cement mixer and taxi accident on Borivali Western Expressway taxi driver died
बोरीवली येथे अपघातात खासगी टॅक्सी चालकाचा मृत्यू
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Dahanu devotee loksatta news
डहाणू : महालक्ष्मी गडावर गेलेल्या भाविकाचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू
Solapur mayor Mahesh kothe death marathi news
Mahesh Kothe : कुंभमेळ्यात स्नान करताना सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांचा हृदयविकाराने मृत्यू
Stunts by bikers kill young man in road accidnet
दुचाकीस्वारांच्या स्टंटबाजीने घेतला रस्त्यावरील तरुणाचा बळी
musician-singer Rahul Ghorpade passes away
प्रसिद्ध संगीतकार-गायक राहुल घोरपडे यांचे निधन
Father murder by psychopath, Risod Taluka,
अकोला : मनोरुग्णाकडून वडिलांची हत्या, घरातच केले डोक्यावर वार
रोलरखाली चिरडून मजुराचा मृत्यू
Story img Loader