मुंबई : वांद्रे पश्चिम येथे रिक्षात बेशुद्ध अवस्थेत सापडलेल्या व्यक्तीच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. या व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नाही. मारहाण व गळा दाबल्यामुळे या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा संशय असून पोलिसांनी याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा – शिवसेना फुटीनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचा नंबर? भाजपा खासदाराचं सूचक वक्तव्य; म्हणाले, “लवकरच…”

ATM money theft pune, thief caught pune,
पुणे : एटीएममधून रोकड चोरणाऱ्या चोरट्याला पकडले; सुरक्षारक्षक, वाहतूक पोलिसांची तत्परता
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Market Technique Stock Market
बाजाराचा तंत्र-कल : शेअर बाजाराला बाळसं की सूज?
dream of five and half thousand policemens house in Lohgaon will come true soon
लोहगावात साडेपाच हजार पोलिसांच्या घराचे स्वप्न लवकरच साकार
Ramesh Chennithala Nana Patole
Congress : बंडखोरांविरोधात काँग्रेस अ‍ॅक्शन मोडवर, मतदानाच्या १० दिवस आधी १६ जण निलंबित
Germanys Warren Buffett Karl Hellerding
जर्मनीचा वॉरेन बफे : कार्ल हेलरडिंग
maharashtra assembly election 2024 ravindra dhangekar vs hemant rasane kasba peth assembly constituency
धंगेकर-रासने लढतीच्या दुसऱ्या फेरीत कोणाची बाजी?
congress mp abhishek manu singhvi remarks on cji chandrachud
चंद्रचूड यांच्या कार्यकाळात सत्तासंघर्षाचा निकाल लांबणीवर पडणे अतर्क्य ; सिंघवी

हेही वाचा – केईएम रुग्णालयातील डॉक्टरांनी महिलेला दिले जीवदान, मेंदूतील रक्तवाहिनीवर आलेला फुगा काढला, अवघ्या ४० हजारांमध्ये शस्त्रक्रिया

वांद्रे तलाव येथील नवपाडा पुलाजवळ रिक्षामध्ये एक व्यक्ती बेशुद्धावस्थेत सापडली होती. तिला वांद्रे येथील भाभा रुग्णालयात नेण्यात आल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केले होते. याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली होती. मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. या व्यक्तीच्या डोळ्यावर, कपाळावर सूज होती. तसेच गळा दाबल्याच्या खुणाही होत्या. त्यामुळे पोलिसांनी याप्रकरणी भादंवि कलम ३०२ अंतर्गत हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. वांद्रे पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार किशोर पाटील यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. मृत व्यक्तीची ओळख पटवण्याच्या दृष्टीने सध्या तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.