महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या लाडक्या बाँड या पाळीव कुत्र्याचे बुधवारी दुपारी निधन झाले. शिवाजीपार्क येथील स्मशान भूमीत त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राज ठाकरे स्वत: उपस्थित होते. बाँड मागील बारा वर्षांहून अधिक काळापासून राज ठाकरे यांच्यासोबत होता, त्यामुळे त्यांना त्याचा खूप लळा होता. आपल्या या लाडक्या कुत्र्याला शेवटचा निरोप देण्यासाठी राज ठाकरे उपस्थित होते. राज यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी जेम्स व बॉन्ड हे दोन पाळीव कुत्रे होते. हे दोन्हीही ग्रेट डेन जातीचे कुत्रे होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

काही दिवसांपूर्वीच जेम्स आणि बाँड या दोघांनी रॅम्बो या पिल्लाला जन्म दिला होता. रॅम्बो सध्या डोंबिवलीतील मनसे कार्यकर्ते राजू पाटील यांच्या घरी असून मागील आठवड्यातच राज यांनी रॅम्बोची भेट घेतली होती. काही वर्षांपूर्वी बाँडने राज यांची पत्नी शर्मिला ठाकरे यांच्या चेहऱ्याचा चावा घेतल्यामुळे त्यांना गंभीर दुखापत झाली होती. त्यावेळी त्यांना ६५ टाके घालण्यात आले होते. तसेच त्यांच्यावर प्लास्टिक सर्जरीही करण्यात आली होती. त्यानंतर या दोघांची रवानगी कर्जत येथील फार्म हाऊसवर करण्यात आली होती. जेम्स आणि बाँड हे दोन्ही राज यांचे लाडके कुत्रे होते. ते दोघेही तळमजल्यावर राहत होते. राज अनेकदा त्यांच्यासोबत खेळायचे. या दोघांना ट्रेनिंग देण्यासाठी राज यांनी खास प्रशिक्षकाची नियुक्ती केली होती.