महापालिकेच्या लेखी जन्म-मृत्यू सारखेच
स्वर्ग, मृत्यूनंतरचे आयुष्य असल्या गोष्टींवर विश्वास असणाऱ्यांना चित्रगुप्ताची नोंदवही नवीन नाही. पाप-पुण्याचा हिशोब या एकाच वहीत नोंदवला जातो. मात्र पालिकेने आता जन्म आणि मृत्यू या दोन्ही घटनांची नोंद एकाच वहीत ठेवण्याचा विचित्र पराक्रम केला आहे. विशेष म्हणजे हा पराक्रम एखाद्या सामान्य व्यक्तीच्या बाबतीत घडला नसून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूच्या नोंदणीबाबत घडला आहे. मृत्यू नोंदणीसाठी असलेल्या वह्या संपल्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूची नोंद जन्माच्या नोंदणीच्या वहीतच करण्यात आली आहे.
पालिकेच्या अनेक स्मशाभूमींमध्ये मृत्यू नोंदणीची वही उपलब्ध नाही. बाळासाहेब ठाकरे यांचे अंत्यसंस्कार ज्या चैत्यभूमी स्मशानभूमीच्या हद्दीत झाले, तेथेही ही वही उपलब्ध नसल्याने बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूची नोंद चक्क जन्माच्या नोंदणीच्या वहीतच झाली. या वहीतील जन्मजात अर्भकाचे नाव या रकान्यासमोर बाळासाहेब ठाकरे यांचे नाव लिहिले गेले आहे, तर जन्माची तारीख या रकान्यासमोर त्यांच्या मृत्युची तारीख लिहिण्यात आली आहे.
पालिकेच्या या ढिसाळ कारभारामुळे महापालिकेच्या लेखी जन्म व मृत्यू सारखेच आहेत का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूची नोंद जन्मनोंदीच्या वहीत
स्वर्ग, मृत्यूनंतरचे आयुष्य असल्या गोष्टींवर विश्वास असणाऱ्यांना चित्रगुप्ताची नोंदवही नवीन नाही. पाप-पुण्याचा हिशोब या एकाच वहीत नोंदवला जातो. मात्र पालिकेने आता जन्म आणि मृत्यू या दोन्ही घटनांची नोंद एकाच वहीत ठेवण्याचा विचित्र पराक्रम केला आहे. विशेष म्हणजे हा पराक्रम एखाद्या सामान्य व्यक्तीच्या बाबतीत घडला नसून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूच्या
आणखी वाचा
First published on: 08-02-2013 at 04:51 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Death record balasaheb thackrey in birth record register