लोकसत्ता खास प्रतिनिधी

मुंबई : उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना समाज माध्यमांवर ठार मारण्याची धमकी देणारा बीडमधील रहिवासी किंचक राधाकृष्ण नवले (३४) याला सांताक्रुझ पोलिसांनी शनिवारी साताऱ्यातून अटक केली. आरोपी वेशांतर करून सातारा येथे राहात होता, अशी माहिती सूत्रांनी दिली. वायरल चित्रफीतीमध्ये आरोपीने स्वतः सरपंच असल्याचे म्हटले असून यापूर्वी अटक आरोपी योगेश सावंत व नवले यांच्यातील संबंधांबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.

mallikarjun kharge replied pm narendra
“पंतप्रधान मोदी म्हणजे ‘झुटों के सरदार’, त्यांनी हेच लाल संविधान…”; ‘त्या’ टीकेला मल्लिकार्जून खरगेंचं प्रत्युत्तर!
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Afghan national behind Iran's plot to assassinate Donald Trump
ट्रम्प यांच्या हत्येचा कट इराणनेच रचला होता? या संदर्भात अटक झालेला फरहाद शकेरी कोण आहे?
loksatta readers feedback
लोकमानस: धोरणांचा प्रचार झालाच नाही
supriya sule on devendra fadnavis
“देवेंद्र फडणवीसांविरोधात आता खटला भरला पाहिजे, त्यांनी राज्यातील…”; छगन भुजबळांच्या ‘त्या’ दाव्यावरून सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल!
Congress response to Fadnavis criticism of the Prime Minister print politics news
‘पंतप्रधानांना बदलायचे आहे हे तेच संविधान’; फडणवीस यांच्या टीकेला काँग्रेसचे प्रत्युत्तर
Loksatta editorial Donald Trump victory in the US presidential election
अग्रलेख: अनर्थामागील अर्थ!
Loksatta editorial Donald Trump won US presidential election
अग्रलेख: तो परत आलाय…

शिवसेना पदाधिकारी अक्षय पनवेलकर यांच्या तक्रारीवरून याप्रकरणी सांताक्रुझ पोलिसांनी भादंवि कलम १५३ (अ), ५००, ५०५ (३), ५०६ (२) व ३४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तक्रारीनुसार, तक्रारदार मंगळवारी सायंकाळी फेसबुक पाहत असताना एका चित्रफीतीमध्ये मुलाखत देणारी व्यक्ती उपमुख्यमंत्री फडणवीस यांना ठार मारण्याबाबत वक्तव्य करीत होती. तसेच यावेळी त्याने दोन जातींमध्ये वाद निर्माण होईल, असेही वक्तव्य केले. तसेच फडणवीस यांची बदनामी केली. ही चित्रफीत युट्युब, फेसबुक व ट्वीटरवर वायरल झाली होती. ‘योगेश सावंत ७७९६’ या वापरकर्त्याने ती फेसबुकवर अपलोड केली होती. तसेच ट्वीटरवरही एका युजरआडीवरून ही चित्रफीत अपलोड करण्यात आली होती. त्यामुळे फडणवीस यांना ठार मारण्याची धमकी व दोन समाजांमध्ये द्वेष निर्माण होईल, असे वक्तव्य केल्याप्रकरणी तक्रार करण्यात आली होती. त्यानुसार पोलिसांनी चित्रफीत शेअर करणाऱ्या योगेश सावंतला पनवेल येथून अटक केली होती. त्यानंतर याप्रकरणी ही प्रक्षोभक मुलाखत देणाऱ्या आरोपीचा शोध सुरू होता. मुलाखत देणारी व्यक्ती नवले असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर तंत्रज्ञानाच्या मदतीने साताक्रुझ पोलिसांच्या पथकाने नवलेला अटक केली.

आणखी वाचा-विरार – सूरत रेल्वे मार्गादरम्यान ब्लॉक

नवले वेशांतर करून सातारा येथे राहत असल्याची माहिती सांताक्रुझ पोलिसांना मिळाली. त्याच्या आधारे सातारा पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या मदतीने नवलेला विसावा नाका येथील हॉटेलमधून शनिवारी अटक करण्यात आली. नवलेने कोणाच्या सांगण्यावरून मुलाखत दिली, याबाबत पोलीस तपास करीत आहेत. मुलाखतीमध्ये नवलेने आपण सरपंच असल्याचे सांगितले आहे. यापूर्वी अटक सावंत व नवले एकाच राजकीय पक्षाशी संबंधित असून त्याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत. दरम्यान, याप्रकरणी आरोपीला न्यायालयाने ७ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणात अटक करण्यात आलेला योगेश सावंतला यापूर्वी न्यायालयाने १४ दिवसांची न्याायलयीन कोठडी सुनावली होती. त्याप्रकरणी सावंतच्या कोठडीसाठी पोलिसांनी सत्र न्यायालयात धाव घेतली. सत्र न्यायालयाने सावंतला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी एकाला नोटीसही बजावण्यात आली आहे.