मुंबई : कला, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक, राजकीय, व्यवसाय आदी विविध क्षेत्राला नामवंत मंडळी देणाऱ्या जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या दादरमधील छबिलदास शाळेच्या इमारतीने १०० व्या वर्षात पदार्पण केले आहे. या क्षणाचे औचित्य साधून मंगळवार, १२ मार्च रोजी छबिलदास शाळेमधील अक्षीकर ताम्हाणे सभागृहात ‘वास्तू अभिवादन सोहळ्या’चे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी छबिलदास वॉल, छबिलदास कल्चरल सेंटर आणि जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या कला शिक्षकांच्या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटनही करण्यात आले.

शंभरीच्या निमित्ताने छबिलदास शाळेची वास्तू विद्युत रोषणाईने उजळून निघाली होती. छबिलदास कल्चरल सेंटरच्या माध्यमातून पुन्हा नाट्य, नृत्य, संगीत आदी विविध कलांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. तर छबिलदास वॉलवर भारतरत्न, महाराष्ट्र भूषण, कला, क्रीडा, समाजकारण आदी विविध क्षेत्रातील दिग्गजांच्या प्रतिमा लावण्यात आल्या आहेत.

100-year-old Nagpur railway station witnesses many transformations
१०० वर्ष जुने नागपूरचे रेल्वेस्थानक अनेक स्थित्यंतरांचे साक्षीदार!
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
ISKCON temple kharghar history
नवी मुंबईतील इस्कॉन मंदिराचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन… इस्कॉनचा इतिहास काय? ही संस्था कशी चालविली जाते?
Athavale claim chairman of trust running Siddharth college
‘पीपल्स’च्या अध्यक्षपदावर रामदास आठवले यांचा दावा; जुन्या इमारतीच्या नूतनीकरणासाठी ५०० कोटींच्या निधीची मागणी
Why Shiv Sainik Dug Wankhede Pitch in 1991 by Orders of Balasaheb Thackrey Before India vs Pakistan Match
Wankhede Stadium: बाळासाहेबांचा इशारा अन् शिवसैनिकांनी वानखेडेचं पिच खोदलं, पाकिस्तान बरोबरच्या ‘त्या’ सामन्यापूर्वी नेमकं काय घडलं होतं?
अमेरिकेच्या लोकसंख्येपेक्षा जास्त भाविक महाकुंभमध्ये सहभागी होणार; २ लाख कोटींच्या उलाढालीची शक्यता; योगी सरकारची तिजोरी भरणार
Mahakumbh mela 2025 (2)
Maha Kumbh Mela 2025: स्मशानवासीन ‘अघोरी’ साधूंचा इतिहास काय सांगतो?
स्वामी विवेकानंद यांनी पाश्चिमात्य देशांना हिंदू धर्माची ओळख कशी करून दिली? (फोटो सौजन्य इंडियन एक्स्प्रेस)
स्वामी विवेकानंद यांनी पाश्चिमात्य देशांना हिंदू तत्वज्ञानाची ओळख कशी करून दिली?

हेही वाचा – सागरी किनारा मार्गावर पहिल्याच दिवशी १६ हजार वाहने, वरळीतून प्रवेश केवळ ५ वाजेपर्यंत, कोंडीमुळे निर्णय

‘वास्तू अभिवादन सोहळ्या’च्या अध्यक्षस्थानी जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष डॉ. उल्हास कोल्हटकर हे होते. तर ज्येष्ठ अभिनेते बाळ धुरी आणि शब्दभ्रमकार रामदास पाध्ये हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूटचे कार्याध्यक्ष शैलेंद्र साळवी, माजी विद्यार्थी व ज्येष्ठ अभिनेते विजय गोखले, आजी – माजी विद्यार्थी व त्यांचे पालक, शिक्षक आदी मान्यवरांनी हजेरी लावली होती. यावेळी प्राथमिक विभागातील दुर्वा मांडवकर व इतर विद्यार्थ्यांनी शाळेचा इतिहास मांडणारे सादरीकरण केले. तसेच विजय गोखले यांनीही शाळेच्या आठवणींना उजाळा देत विशेष सादरीकरण केले.

‘माझ्यातील आत्मविश्वासाचा मूळ पाया छबिलदास शाळेच्या मंचावर रचला गेला. या वास्तूमध्ये केव्हाही आल्यावर एक वेगळी ऊर्जा मिळते आणि जुने दिवस आठवतात’, असे गोखले म्हणाले. ‘मला अजिबात बोलता येत नाही, फक्त माझ्या बाहुल्या बोलत असतात. पण या बाहुल्या बोलण्याचे कसब छबिलदास शाळेने शिकविले. माझ्या वडिलांचे आकस्मिक निधन झाल्यामुळे त्यांचा सहवास कमी लाभला. पण छबिलदास शाळेने दिलेला आत्मविश्वास वेळोवेळी उपयोगी पडला’, असे रामदास पाध्ये आवर्जून म्हणाले. तर बाळ धुरी यांनी सांगितले की, ‘माझी जडणघडण छबिलदास शाळेत झाली असून या शाळेने केलेल्या संस्कारामुळे आज आम्ही आहोत. हल्लीचे विद्यार्थी गुरुजनांना सर व मॅडम बोलतात. पण आमच्यावेळी आम्ही गुरुजी बोलायचो. कारण गुरुजी बोलण्यात प्रेम, जिव्हाळा व आपुलकी आहे’. वास्तू अभिवादन सोहळ्यात प्रातिनिधिक स्वरूपात संस्था व शाळेसाठी योगदान दिलेल्या व्यक्तींचाही सत्कार करण्यात आला.

हेही वाचा – रोजगार मेळाव्याच्या कार्यक्रमात अनुकंपा तत्वावर नियुक्तीची पत्रे, मध्य रेल्वेतील धक्कादायक प्रकार

दिवंगत गोपाळ नारायण अक्षीकर आणि के. बी. ताम्हाणे यांच्या प्रयत्नातून २४ एप्रिल १८९२ रोजी जनरल एज्युकेशन इन्स्टिट्युटची स्थापना झाली. तर २ जून १८८९ मध्ये दादरमध्ये ‘दादर इंग्लिश स्कूल’ या नावाने शाळेची सुरुवात झाली होती. बोरिवलीतील जनमेजय छबिलदास यांनी आपले वडील लल्लुबाई यांच्या स्मरणार्थ या शाळेस १ लाख ३० हजार रुपयांची देणगी दिली आणि या देणगीतून दादरमध्ये शाळेची दोन मजली इमारत उभारली गेली. त्यानंतर १२ मार्च १९२४ रोजी तत्कालीन गव्हर्नर लॉर्ड केसर विल्सन यांच्या हस्ते शाळेच्या इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. द्वारकानाथ वैद्य हे या इमारतीचे वास्तुविशारद होते. तसेच या देणगीसाठी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शाळेचे नाव ‘छबिलदास लल्लुभाई मुलांचे विद्यालय’ असे ठेवण्यात आले.

‘प्रायोगिक नाट्यचळवळीचे माहेरघर’ म्हणून छबिलदास शाळेची ओळख आहे. ही नाट्यचळवळ नाट्यकर्मी, समीक्षक आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये ‘छबिलदास चळवळ’ म्हणून ओळखली जाते. ‘आविष्कार’ ही नाट्यसंस्थाही याच वास्तूतून उदयास आली. मुंबईतील शिक्षक संघटनाही याच वास्तूत मोठ्या झाल्या. सध्या जनरल एज्युकेशन इन्स्टिट्युटची १३२ व्या वर्षात यशस्वी घौडदौड सुरू आहे. आता जनरल एज्युकेशन इन्स्टिट्युटच्या सर्व शाळांमध्ये सौर ऊर्जेची यंत्रणा बसविण्यासाठी संस्था प्रयत्नशील असून त्यासाठी माजी विद्यार्थ्यांनी हातभार लावण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Story img Loader