मुंबई: ‘मराठी पाऊल पडते पुढे’ या आगामी मराठी चित्रपटाचे नवोदित लेखक – दिग्दर्शक स्वप्नील मयेकर यांचे गुरुवारी पहाटे निधन झाले. गेले काही दिवस ते आजारी होते. मृत्युसमयी ते ४६ वर्षांचे होते. ‘मराठी पाऊल पडते पुढे’ या त्यांचा पहिल्या दिग्दर्शित आणि लिखित चित्रपट ५ मे रोजी प्रदर्शित होत असून चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच स्वप्नील यांचे निधन झाले. स्वप्नील यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यापूर्वी स्वप्नील मयेकर यांनी ‘हा खेळ संचितांचा’ या मालिकेसाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले होते. त्याशिवाय त्यांनी एका भोजपुरी चित्रपटाचेही दिग्दर्शन केले होते. ‘मराठी पाऊल पडते पुढे’ या त्यांच्या पहिल्या दिग्दर्शित आणि लिखित चित्रपटात खानदेशातील शेतकरी कुटुंबामधील युवक मुंबईत व्यावसायिक बनण्यासाठी येतो. त्याची संघर्षकथा या चित्रपटात मांडण्याचा प्रयत्न स्वप्नील यांनी आपल्या लिखाणातून आणि दिग्दर्शनातून केला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Debutant writer director of marathi film swapnil mayekar passed away amy