मुंबईहून मडगावला जाणारी मांडवी एक्सप्रेस आणि मुंबईहून पुण्याला जाणारी डेक्कन एक्सप्रेस या दोन्ही गाडय़ांच्या सुटण्याच्या वेळेत सोमवारपासून बदल करण्यात आले आहेत. मुंबईहून सकाळी ६.५५ वाजता सुटणारी मांडवी एक्सप्रेस आता १५ मिनिटांनंतर म्हणजेच ७.१० वाजता रवाना होईल. तर सकाळी ७.१० वाजता सुटणारी मुंबई-पुणे डेक्कन एक्सप्रेस दहा मिनिटे आधी ७.०० वाजता सुटेल. हा बदल सोमवारपासूनच लागू होणार असल्याचे मध्य रेल्वेतर्फे सांगण्यात आले. तरी प्रवाशांनी या बदललेल्या वेळेची नोंद घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.
मांडवी व डेक्कन एक्सप्रेसच्या वेळापत्रकात बदल
मुंबईहून मडगावला जाणारी मांडवी एक्सप्रेस आणि मुंबईहून पुण्याला जाणारी डेक्कन एक्सप्रेस या दोन्ही गाडय़ांच्या सुटण्याच्या वेळेत सोमवारपासून बदल करण्यात आले आहेत. मुंबईहून सकाळी ६.५५ वाजता सुटणारी मांडवी एक्सप्रेस आता १५ मिनिटांनंतर म्हणजेच ७.१० वाजता रवाना होईल.
First published on: 02-07-2013 at 02:57 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deccan and mandovi express changes in schedule