मुंबई : मुंबईतील लोकसंख्या २०११ सालच्या जनगणनेनुसार ३.८७ टक्के वाढली होती. त्यानंतरही २०१७ सालच्या निवडणुकांमध्ये प्रभाग संख्या वाढवण्यात आली नाही, परंतु गेल्या दहा वर्षांत मुंबईची लोकसंख्या वाढल्याचे गृहीत धरून त्यानुसार प्रभाग संख्या वाढवणे गरजेचे आहे. त्यामुळेच आगामी निवडणुकांसाठी प्रभाग संख्या वाढवण्याच्या आपल्या अधिकाराचा वापर आम्ही केला असून प्रभागवाढीचा  निर्णय कायद्याच्या चौकटीत राहूनच असल्याचा दावा राज्य सरकारने बुधवारी उच्च न्यायालयात केला. भाजप नगरसेवकांनी प्रभाग संख्या वाढवण्याविरोधात केलेली याचिका दंडासह फेटाळण्याची मागणी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अभिजीत सामंत आणि राजश्री शिरवाडकर या भाजपच्या दोन नगरसेवकांनी प्रभाग संख्या २२७ वरून २३६ करण्याच्या निर्णयाला आव्हान दिले आहे. न्यायमूर्ती अमजद सय्यद आणि न्यायमूर्ती अभय अहुजा यांच्या खंडपीठासमोर याप्रकरणी सुनावणी झाली. त्यावेळी भारतीय जनगणना आयोगातर्फे दर दहा वर्षांनी जनगणना केली जाते. परंतु त्याची आकडेवारी लगेचच उपलब्ध होते असे नाही. त्यामुळे त्या आधीच्या जनगणनेच्या आधारे लोकसंख्या किती वाढली यावरून प्रभाग संख्या वाढवणे, आरक्षणाचा निर्णय घेतला जातो.

२०१३ आणि २०१७ साली झालेल्या  निवडणुकीच्या वेळी २०११ सालच्या जनगणनेच्या आधारे प्रभाग संख्या वाढवण्यात आली नव्हती. परंतु २०११ सालच्या जनगणनेनुसार मुंबई पालिका हद्दीत गेल्या दहा वर्षांत ३.८७ टक्के लोकसंख्या वाढली.  गेल्या दहा वर्षांतही ती वाढली असल्याचे गृहीत धरून प्रभाग संख्या वाढवण्याचा अधिकार सरकारला असल्याचा युक्तिवादही महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी केला.