राज्याच्या अनेक भागात झालेली गारपीट ही राष्ट्रीय आपत्ती जाहीर करण्यात यावी आणि शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी केली आहे.
गारपीटीमुळे सुमारे २५ हजार कोटी रुपयांहून अधिक वित्तहानी झाल्याचा अंदाज आहे, असे मुंडे यांनी प्रदेश कार्यालयात पत्रकारांना सांगितले. अद्याप ५० टक्केही पंचनामे पूर्ण झालेले नाहीत़ आचारसंहितेचा बागुलबुवा उभा करून भरपाई देण्यास विलंब करण्यात येत आहे. वास्तविक त्यासाठी नियमांचा कोणताही अडथळा येऊ नये, असे मुंडे यांनी स्पष्ट केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा