भारतीय नौदलातून निवृत्त करण्यात आलेली विमानवाहू युद्धनौका “आयएनएस विक्रांत’चा ६० कोटी रूपयांना लिलाव करण्यात आला. ‘आयएनएस विक्रांत’ या युद्धनौकेने १९७१ सालच्या भारत-पाकिस्तान युद्धामध्ये मोलाची भूमिका बजावली होती. १९६१ मध्ये नौदलात दाखल झालेल्या “आयएनएस विक्रांत’ची देखभाल करण्यास महाराष्ट्र सरकारने यापूर्वीच असमर्थता दर्शविली होती. ‘आयएनएस विक्रांत’चा लिलाव न करता या युद्धनौकेचे संग्रहालयात रूपांतर करण्यात यावे, अशी मागणी यापूर्वी करण्यात आली होती. मुंबई महानगरपालिकेने यासाठी १०० कोटींचा निधी देण्याचीसुद्धा तयारी दाखविली होती. मात्र, ‘आयएनएस विक्रांत’चे संग्रहालयात रूपांतर करणे आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य नसल्याने या युद्धनौकेचा लिलाव करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार मागील आठवड्यात झालेल्या लिलाव प्रक्रियेत आयबी कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने ६० कोटींच्या मोबदल्यात ‘आयएनएस विक्रांत’ खरेदी केली.

Story img Loader