Best Bus Mumbai : बेस्ट प्रशासनाने गणेशोत्सवापूर्वी ‘बेस्ट बचाव अभियान’ अधिकाधिक मुंबईकरांपर्यंत पोहोचावे, यासाठी सार्वजनिक गणेश मंडळांना साद घातली होती. त्यामुळे मुंबईतील अनेक गणेशोत्सव मंडळांनी ‘बेस्ट’ उपक्रमाला पाठिंबा देत ‘बेस्ट’ बचाव अभियानाचे देखावे साकारले आहेत. बेस्ट उपक्रमाच्या स्वमालकीच्या बसचा कमी होत चाललेला ताफा आणि अल्पदरात उपलब्ध होणाऱ्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला लागलेली घरघर याबाबत जनजागृती करणारे फलक आणि आकर्षक देखावे साकारण्यात आले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबईकरांना विनाअडथळा वाहतूक सेवा देण्यासाठी ‘बेस्ट’ उपक्रमाच्या ताफ्यात स्वमालकीच्या किमान ३,३३७ बस आवश्यक आहेत. मात्र, सध्या बेस्ट उपक्रमाकडे स्वामालकीच्या १,०७८ म्हणजेच केवळ ३३ टक्के बस शिल्लक आहेत. नव्या गाड्या वेळेत खरेदी करण्यात आल्या नाहीत. तर बेस्टची सार्वजनिक परिवहन सेवा डिसेंबर २०२५ नंतर संपुष्टात येऊ शकते. त्यामुळे मुंबईकरांच्या साथीने बेस्ट बचाव अभियान सुरू करण्यात आले आहे. कुर्ला येथील ‘शिवशक्ती मित्र मंडळा’तर्फे बेस्ट बचाव अभियानाचा आकर्षक देखावा साकारला आहे. शिवाय, कुर्ला येथील क्रांतिनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, बैल बाजार येथील सर्वोदय मित्र मंडळ, कुर्ला येथील तानाजी मित्र मंडळ, बजरंग सेवा संघ, कोपरखैरणे येथील एकदंत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, माटुंगा येथील प्रगती नगर गणेशोत्सव मंडळ यांसह मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील अनेक मंडळांनी बेस्ट बचाव अभियानाचे फलक मंडपात उभारले आहेत.

हेही वाचा – ७० वर्षे जुनी गणेश कार्यशाळा रिकामी होताना…झावबा वाडीतील इमारतीच्या पुनर्विकासाला सुरुवात

मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील अनेक मंडळांच्या मंडपामध्ये फलक उभारण्यात आले आहेत. ‘बेस्ट’ बस सेवेबाबत जनजागृती करणारे फलक आणि आकर्षक देखावे साकारण्यात आले आहेत.

हेही वाचा – महिला अत्याचार तपासातील त्रुटींवरून उच्च न्यायालयाची तीव्र नाराजी

२०१९ पासून निधीच नाही

‘बेस्ट’ प्रशासनाने २०१८ सालानंतर एकही स्वमालकीची बस खरेदी केलेली नाही. सर्व बस आणि कामगार कंत्राटी पद्धतीने घेण्यात आले आहेत. नव्या गाड्या खरेदीसाठी महापालिकेने बेस्ट उपक्रमाला निधी पुरविणे आवश्यक आहे. मात्र, पालिकेने २०१९ पासून ‘बेस्ट’ उपक्रमाला नव्या गाड्यांच्या खरेदीसाठी एकदाही निधी दिलेला नाही. ही स्थिती कायम राहिल्यास मार्च २०२५ मध्ये बेस्ट उपक्रमाकडे स्वमालकीच्या ७७५, तर नोव्हेंबर २०२५ मध्ये ५५१ (८ टक्के) गाड्या शिल्लक राहतील. परिणामी, २०२५ नंतर मुंबईकरांना मिळणारी बेस्ट सेवा बंद होईल, अशी भीती कामगार नेते शशांक राव यांनी व्यक्त केली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Decoration from mumbai best bus rescue mission mumbai print news ssb