दोन दिवसांपूर्वीच शिवसेना खासदार संजय राऊत हे जम्मू-काश्मीरमध्ये भारत जोडो यात्रेत सहभागी झाले होते. त्यानंतर शिंदे गट-भाजपाकडून त्यांच्यावर जोरदार टीकाही करण्यात आली. दरम्यान, यावरून शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी संजय राऊतांना खोचक टोला लगावला आहे. आम्ही एखाद्या ठिकाणी गेलो की ठाकरे गट गोमुत्र शिंपडून ती जागा पवित्र करतात. मात्र, आता राहुल गांधींच्या यात्रेत सहभागी झालेल्यांचंही शुद्धीकरण करायला हवं, असे ते म्हणाले. टीव्ही ९ वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा – धीरेंद्र महाराज-अंनिस वादात आता राम कदमांची उडी; म्हणाले, “स्वत:ला अंधश्रद्धा निर्मुलनकार म्हणवून घेणारे…”

Eknath Shinde On Sharad Pawar
Eknath Shinde : शरद पवार-एकनाथ शिंदे संपर्कात आहेत का? मलिकांच्या ‘त्या’ विधानावर मुख्यमंत्र्यांचं भाष्य; म्हणाले, “दुसरा विचार…”
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
Rahul Gandhi Amravati
“पंतप्रधान मोदींना स्मृतीभ्रंश झालाय, ते आजकाल…”; अमरावतीतल्या सभेतून राहुल गांधींचा हल्लाबोल!
Rahul Gandhi Amravati
Rahul Gandhi: “अदानींसाठीच भाजपने आमचे सरकार पाडले”, राहुल गांधी यांचा आरोप
Revanth Reddy : “ते भारताचे पंतप्रधान आहेत, पण…”; तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांची नरेंद्र मोदींवर गंभीर टीका!
Rahul gandhi
Rahul Gandhi : “आदिवासी अधिकाऱ्याला मागे बसवलं जातं अन्…”, नंदूरबारमध्ये राहुल गांधींचा मोठा दावा!
Sharad Pawar On Dilip Walse Patil
Sharad Pawar : शरद पवारांचा दिलीप वळसे पाटलांना जाहीर इशारा; म्हणाले, ‘गद्दाराला शिक्षा द्यायची, १०० टक्के…’

काय म्हणाले दीपक केसरकर?

“काश्मीरमधून कलम ३७० रद्द करणं हे बाळासाहेबांचं स्वप्न होतं. मात्र, ज्या काँग्रेसने या कलमाचा पुरस्कार केला, त्या काँग्रेसच्या लोकांना शिवसेनेनं काश्मीरमध्ये जाऊन भेटणं, यासारखा बाळासाहेबांचा घोर अपमान असूच शकत नाही”, अशी प्रतिक्रिया दीपक केसरकर यांनी दिली. “अनेक ठिकाणी आम्ही गेल्यानंतर ठाकरे गटाचे नेते गोमुत्राने ती जागा पवित्र करतात. त्याऐवजी आता जे लोकं काश्मीरमध्ये जाऊन भारत जोडो यात्रेत सहभागी झाले, त्यांचंही शुद्धीकरण केलं गेलं पाहिजे”, अशी खोचक टीकाही त्यांनी संजय राऊतांचं नाव न घेता केली. “मला एक दिवसासाठी पंतप्रधान केलं तर मी काश्मीरमधून कलम ३७० रद्द करून दाखवेन, असं म्हणणारे बाळासाहेब कुठे आणि सत्तेसाठी काँग्रेसच्या मागे धावणारे शिवसैनिक कुठे, यावर विचार करण्याची गरज आहे”, असेही म्हणाले.

हेही वाचा – “एकनाथ शिंदेंचा अपमान झाला होता, जेव्हा उद्धव ठाकरेंनी त्यांना विचारलं…”, दीपक केसरकरांनी सांगितला ‘तो’ प्रसंग!

नाना पटोलेंच्या टीकेलाही दिलं प्रत्युत्तर

दरम्यान, १४ फेब्रुवारील राज्यातील शिंदे कोसळेल असा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला होता. याबाबत ही केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली. “जी लोक झोपतात, ते लोक स्वप्न बघतात आणि जी लोक काम करतात, ती लोक कायम धावत राहतात. त्यामुळे मुख्यमंत्री रात्री दोन अडीच वाजेपर्यंत काम करतात”, असे ते म्हणाले.