मुंबई : नौदलाच्या बोटीची देखरेख व दुरुस्ती करण्याची जबाबदारी असलेल्या एका खासगी कंपनीत कार्यरत असलेला बोट मेकॅनिक दीपक तिलेकर (२८) बोटीच्या दुरुस्तीसाठी मुंबईत आला होता. दर महिन्याला किमान एकदा त्याला नौदलाच्या कार्यालयात यावे लागत होते. मात्र यावेळची त्याची भेट ही अखेरची ठरली. हैदराबाद येथे राहत असलेला दीपक तिलेकर (२८) बोट मेकॅनिक होता.

दीपकला चार भाऊ असून, भावंडांमध्ये दीपक सर्वात लहान होता. तो पाच वर्षांपूर्वी एका खासगी कंपनीमध्ये कामाला लागला. त्या कंपनीकडे नाैदलातील बोटींच्या देखभाल, दुरुस्तीचे काम होते. त्यामुळे कंपनीतर्फे त्याला वारंवार मुंबईमध्ये यावे लागत होते.

हेही वाचा…पर्यटनाची आवड जीवावर बेतली गोवंडीतील दीपक वाकचौरे यांचा बोट अपघातात मृत्यू

दर महिन्याला किमान एकदा तो बोटीच्या इंजिनच्या देखभाल-दुरुस्तीसाठी मुंबईत येत होता. या महिन्यातही तो बोटीच्या इंजिनच्या देखभाल-दुरुस्तीसाठी मुंबईत आला होता. तो चेंबूर येथे थांबला होता. बुधवारी तो नौदलाच्या स्पीड बोटच्या इंजिनची तपासणी करण्यासाठी गेला होता. अपघात झाला त्यावेळी तो बोटीमध्ये बोटचालकाच्या बाजूला बसला होता, अशी माहिती दीपकचा भाऊ श्रवण तिलेकर यांनी दिली.

Story img Loader