अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय. “ज्यांच्या हातात आपल्या बायकोचं नियंत्रण नाही, ते म्हणतात की मी १३ वर्षांचा असताना बाबरी मशीद तोडायला गेलो होतो,” असं म्हणत दिपाली सय्यद यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. दिपाली सय्यद मुंबईत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलत होत्या.

दिपाली सय्यद म्हणाल्या, “देवेंद्र फडणवीस बाबरी पाडण्यासाठी गेले होते हे कुणालाही पटणार नाही. ते म्हणतात मी तेव्हा १२८ किलोचा होतो. वजनावर कसा निर्णय घेणार? ते म्हणतात १३ वर्षांचे असताना गेले होते, मात्र १३ वर्षांचं असताना उतरू शकता का?”

Prakash Ambedkar
“RSS ने बाबासाहेबांच्या हिंदू कोड बिलाला विरोध केलेला”, प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल; म्हणाले, “भाजपा लोकांचं लक्ष वळवण्यासाठी…”
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
nitin raut Devendra fadnavis
गुंडांना खुद्द मुख्यमंत्र्यांचे संरक्षण, डॉ. नितीन राऊत म्हणाले…
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांचं नॉनव्हेज खाणाऱ्यांना घरे नाकारणाऱ्यांबद्दल मोठं वक्तव्य; सरकारची भूमिका मांडताना म्हणाले…
opposition angry over Amit Shahs controversial statement about dr babasaheb ambedkar
‘बाबासाहेब का अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान’, अमित शहांच्या वादग्रस्त मुद्यावर विरोधक संतप्त
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray : ‘काँग्रेसनेही बाबासाहेबांचा अपमान केला’ विचारताच उद्धव ठाकरे म्हणाले, “दुसऱ्याने शेण खाल्लं…”
devendra Fadnavis
Devendra Fadnavis : ओबीसींचा वापर करून घेतल्याच्या आरोपावर फडणवीसांचे प्रत्युत्तर; म्हणाले, “काँग्रेसमध्ये झालेल्या अन्यायाचा राग…”
Shivsena UBT Sanjay Raut Allegation PM Modi
DY Chandrachud : “धनंजय चंद्रचूड यांच्यावर खटला दाखल व्हायला हवा”, ठाकरे गटाचे गंभीर आरोप; मोदींवरही टीकास्र

“ज्यांच्या हातात आपल्या बायकोचं नियंत्रण नाही, ते…”

“ज्यांच्या हातात आपल्या बायकोचं नियंत्रण नाही, त्यांची बायको काहीही बोलते, ते म्हणतात माझी बायको माझं ऐकत नाही. ते म्हणतात की १३ वर्षांचे असताना बाबरी मशीद तोडायला गेलो होतो,” असं म्हणत दिपाली सय्यद यांनी फडणवीसांवर निशाणा साधला.

हेही वाचा : राज्यसभा निवडणुकीत संभाजीराजे छत्रपती यांना पाठिंबा देणार का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मोदींनी…”

“राज साहेबांचं लग्न झालं असतं आणि ते सासरी गेले असते तर…”

दिपाली सय्यद म्हणाल्या, “राज साहेबांचं लग्न झालं असतं आणि ते सासरी गेले असते तर त्यांचं नाव बदली झालं असतं की नाही. हे कोणी बनवलं आहे? एखाद्या मुलीचं लग्न झालं की नवरा तिचं नाव बदली करतो हे संस्कार आहेत. त्याचप्रमाणे माझ्या नवऱ्याने माझं नाव लाडाने सोफिया ठेवलं.”

“माझ्या नवऱ्याची दुसरी किंवा तिसरी कुठलीही बायको नाही”

“मनसे माझ्या नावाच्या गोष्टीचं किती भांडवल करणार? मनसेकडे फक्त दिपाली सय्यद, सोफिया सय्यद एवढीच गोष्ट आहे का? आजपर्यंत, आत्तापर्यंत मी तशीच आहे. मी २५ वर्षांचा संसार केलाय. माझा नवरा आहे, एक मुलगा आहे, माझं पूर्ण कुटुंब आहे. माझ्या नवऱ्याची दुसरी किंवा तिसरी कुठलीही बायको नाही,” असं दिपाली सय्यद यांनी सांगितलं.

हेही वाचा : “अवसरवादी ताई, तुम्हाला धड तुमचं…”, राज ठाकरेंना टोला लगावणाऱ्या दिपाली सय्यद यांना मनसेचं आव्हान!

“यूट्यूब व इतर ठिकाणची माझ्या नावाविषयीची सर्व माहिती खोटी”

“यूट्यूब आणि इकडून तिकडून गोष्टी जमा केल्या जातात ते सर्व खोटं आहे. त्यामुळे या दोन नावांमध्ये गोंधळ नसलं पाहिजे. मुलीचं नाव बदलतं एवढंच. आत्ता आत्ता मुली पवित्र घेतात की मला नाव बदलायचं नाही. मलाही वाटतं मी आहे तशीच राहणार,” असंही दिपाली सय्यद यांनी नमूद केलं.

Story img Loader