ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्याबाबत मानहानीकारक मजकूर प्रसिद्ध केल्याप्रकरणी स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नीतेश राणे यांच्यावर माहीम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तहलका प्रकरणानंतर स्वाभिमान पक्षातर्फे शिवाजी पार्क, विक्रोळी आणि लोअर परळ येथे पोस्टर्स लावण्यात आली होती. त्यात ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्याबाबत मानहानीकारक वक्तव्य प्रसिद्ध करण्यात आले होते. याशिवाय ट्विटरवरुनही राणे यांनी वागळे यांना ‘महाराष्ट्रातील तेजपाल’ असे संबोधून अवमान केला होता. त्याविरोधात वागळे यांनी १७ डिसेंबर रोजी माहीम पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. त्यामुळे राणे यांच्या विरोधात बदनामी करणे, तसेच आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुरावे गोळा करण्याचे काम सुरू असून त्यानंतर पुढची कारवाई केली जाईल, असे माहीम पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर सावंत यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा