मुंबई : शिवसेनेतील आमदारांना एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आपल्या बाजूला वळवत राज्यात सत्तांतर घडवल्यानंतर आता भाजपने आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि पुढील विधानसभा- लोकसभा डोळय़ासमोर ठेवून राज्यातील विविध भागांत राजकीय मेगाभरतीचे लक्ष्य ठेवत मोहीम सुरू केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

काँग्रेस-राष्ट्रवादीचे स्थानिक नेते, माजी आमदार-पदाधिकाऱ्यांशी भाजप प्रवेशाची बोलणी सुरू झाली असून पश्चिम महाराष्ट्रात त्यास प्रतिसाद मिळू लागला आहे. विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात मात्र सर्वोच्च न्यायालयाचा शिंदे-फडणवीस सरकारबद्दलचा निर्णय येईपर्यंत ‘थांबा आणि वाट पाहा’ असे धोरण अनेकांनी स्वीकारले आहे.

राज्यातील सत्तांतरानंतर सोलापुरात शिवसेनेसह काँग्रेस, राष्ट्रवादीलाही घरघर लागण्याची चिन्हे दिसत आहेत. अनेक नेते भाजपच्या उंबरठय़ावर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे जुने समर्थक व पवारनिष्ठ अशी ओळख असलेले मोहोळचे माजी आमदार राजन पाटील-अनगरकर हे आपल्या मुलांसह राष्ट्रवादीतील साठमारीच्या राजकारणाला कंटाळून भाजपच्या वाटेवर आहेत. राजन पाटील यांच्या मुलाने त्याबाबत जाहीर संकेतही दिले. भाजपनेही जिल्ह्यात शिल्लक राहिलेल्या राष्ट्रवादीच्या मोहोळ आणि माढा या दोन्ही गडांवर लक्ष केंद्रित केले आहे. राजन पाटील यांच्याबरोबरच माढय़ाचे आमदार तथा साखरसम्राट बबनदादा शिंदे यांनाही गळाला लावण्याचा प्रयत्न भाजपने चालविला आहे. आमदार शिंदे आणि त्यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे यांचे खासगी आणि सहकारी साखर कारखानदारीचे मोठे जाळे आहे. त्यादृष्टीने काही समीकरणे मांडली जात आहेत. मात्र बबनदादा शिंदे यांनी अद्याप त्यास प्रतिसाद दिलेला नाही. अक्कलकोट तालुका हा भाजपचा मजबूत गड मानला जातो. काँग्रेसचे माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे हे मागील विधानसभा निवडणुकीतच काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजप प्रवेशाच्या मानसिकतेत होते. परंतु त्यासाठीचे राजकीय गणित जमले नाही म्हणून म्हेत्रे यांना नाइलाजास्तव काँग्रेसमध्येच राहावे लागले. आता मात्र त्यांचे निष्ठावंत सहकारी महिबूब राजेभाई मुल्ला आणि विलास गव्हाणे या दोन्ही माजी सभापतींनी भाजपची वाट धरली आहे. तशी भूमिका दोघांनी जाहीर केली आहे.

सोलापूर शहरात काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाला होता. इतर पक्षांतून अनेक जण राष्ट्रवादीच्या वाटेवर होते. पण सत्तांतरानंतर ते सर्व जण थांबले. आता उलट शिवसेना आणि राष्ट्रवादीत फाटाफूट होण्याची चिन्हे दिसत आहेत. ही मंडळी भाजप आणि शिंदे गटाच्या आश्रयाला जातील असे चित्र आहे. तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी जवळपास राजकीय निवृत्ती घेतल्याने पक्षातील स्थानिक नेते राजकीय भवितव्यासाठी दुसरीकडे जाण्याच्या मानसिकतेत आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे- देवेंद्र फडणवीस यांची सत्ता आल्यानंतर कोल्हापुरात भाजपला पाठिंबा देणाऱ्या अपक्ष आमदारांची भाजपशी सलगी वाढू लागली आहे. प्रकाश आवाडे, विनय कोरे यांनी भाजपशी जवळीक वाढवायला सुरुवात केली आहे. आवाडे हे भाजपच्या वाटेवर असून त्यांचा प्रवेश ही केवळ औपचारिकता उरल्याचे चित्र आहे. ‘भाजप, भाजप आणि भाजप’ असा शब्दप्रयोग आवाडे वारंवार करत आहेत. आगामी सर्व निवडणुका भाजपच्या माध्यमातून लढवण्यात येतील, असे त्यांनी उघडपणे सांगितले आहे.

सत्तांतराचे परिणाम पुणे शहरातही दिसू लागले आहेत. भाजपमध्ये गेलेले काही नगरसेवक हे राष्ट्रवादीच्या वाटेवर होते. त्यांनी आता आहे तिथे थांबणे पसंत केले आहे. तर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधील २० ते २२ नगरसेवकांनी भाजपकडून उमेदवारी मिळू शकते का, याची चाचपणी सुरू केली आहे. तर पिंपरी चिंचवडमध्ये काँग्रेसचा एक वरिष्ठ नेता भाजपच्या उंबरठय़ावर आहे. याशिवाय, प्रभाग रचना आणि आरक्षणाचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर सर्व पक्षांमध्ये पक्षांतराला ऊत येईल, असे संकेत आहेत.

सत्तांतरामुळे सांगलीत राष्ट्रवादीच्या भरतीला खीळ बसली. भाजपमध्ये असलेले दोन माजी आमदार राष्ट्रवादीत लवकरच डेरेदाखल होतील असे सूतोवाच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले होते. यामुळे भाजपमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. शिराळय़ाचे माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक, आटपाडीचे राजेंद्र देशमुख आणि जतचे विलासराव जगताप यांच्या नावांवरून तर्कवितर्क सुरू झाले होते. पैकी नाईक यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तर जगताप यांनी एका निर्णयावरून जयंत पाटील यांचा जाहीर सत्कार आयोजित केला. पण सत्तांतरानंतर राष्ट्रवादीच्या भरतीला खीळ बसली.

नाशिकमध्ये आगामी महापालिका, जिल्हा परिषदेची निवडणूक ध्यानात घेऊन भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असलेले शिवसेना, काँग्रेस तसेच राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक, पदाधिकारी सध्या द्विधा मन:स्थितीत आहेत. अनेक नेते सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची प्रतीक्षा करत सध्या कुंपणावर बसले आहेत. त्यानंतरच पक्षांतराच्या घडामोडींना वेग येईल.

२०२४ ची तयारी..

सत्तांतरनाटय़ संपल्यानंतर आता २०२४च्या दृष्टीने नेत्यांची तयारी सुरू झाली आहे. आगामी निवडणुकांसाठी कोणता पक्ष योग्य ठरेल, यासाठी नेत्यांनी चाचपणी सुरू केली आहे. पश्चिम वऱ्हाडातील अकोला, वाशीम आणि बुलढाणा जिल्ह्याचा विचार केल्यास बहुतांश विधानसभा मतदारसंघांवर भाजपचे वर्चस्व आहे. भाजपच्या प्रस्थापित नेत्यांमुळे एक-दोन अपवाद वगळता तिन्ही जिल्ह्यांतील काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील इच्छुक भाजप प्रवेशच्या विचारापासूनच दूर आहेत. भाजपमध्ये अंतर्गत स्पर्धा तीव्र असल्याने नव्यांना संधी मिळणे कठीण होईल, हा विचार त्यामागे आहे.