डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी इंदू मिलच्या जमिनीच्या हस्तांतरणास आणखी काही महिने लागण्याची शक्यता आहे. आंबेडकर स्मारकासाठी जमीन देण्याची घोषणा झाली असली तरी, जमिनीच्या हस्तांतरणासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या व संसदेच्या औपचारिक मान्यतेची वाट बघावी लागणार आहे, असे सांगण्यात येते.
इंदू मिलची संपूर्ण जमीन बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी मिळावी, यासाठी दोन वर्षे आंदोलने सुरु होती. संसदेत  ५ डिसेंबर २०१२ रोजी त्याबाबतची घोषणा करण्यात आली. निवडणुकांमध्ये त्याचा फायदा घेण्यासाठी काँग्रेसही सज्ज झाली आहे. परंतु जमिनीचे हस्तांतरण कधी होणार आणि स्मारकाच्या कामाला नेमकी कधी सुरुवात होणार, याबद्दल अद्याप तरी अनिश्चिता आहे.

Story img Loader