पुण्यात बेदरकारपणे एसटी बस चालवून नऊजणांचा बळी घेतल्याप्रकरणी पुणे सत्र न्यायालयाने सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेला संतोष माने याने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. मात्र त्याचे वकील काही ना काही सबब पुढे करून सुनावणीला गैरहजर राहत असल्याबाबत न्यायालयाने मंगळवारी तीव्र नाराजी व्यक्त करीत सुनावणी जून महिन्यापर्यंत तहकूब केली.
आपली मानसिक स्थिती नीट नसून आपल्यावर त्या अनुषंगाने उपचार सुरू असल्याचा दावा करीत माने याने फाशीच्या शिक्षेला आव्हान दिले आहे. न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती अनुजा प्रभूदेसाई यांच्या खंडपीठासमोर त्याच्या अपिलावर मंगळवारी सुनावणी झाली. त्या वेळी मानेचे वकील गैरहजर असल्याचे आणि मागील काही सुनावणींपासून हे होत असल्याची बाब अतिरिक्त सरकारी वकील माधवी म्हात्रे यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. त्यावर संतापलेल्या न्यायालयाने वकिलांच्या अशा बेजबाबदारपणाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. वकील गैरहजर कसे राहू शकतात किंवा सुनावणी तहकूब करण्याची मागणी कशी शकतात, असा सवाल न्यायालयाने केला.
संतोष माने फाशीप्रकरणी चालढकल
पुण्यात बेदरकारपणे एसटी बस चालवून नऊजणांचा बळी घेतल्याप्रकरणी पुणे सत्र न्यायालयाने सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेला संतोष माने याने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.
First published on: 30-04-2014 at 01:06 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Delayed in santosh mane case