मुंबई : गेल्या काही दिवसांपासून दिल्लीची हवा अति धोकादायक पातळीवर गेली आहे. बुधवारी (२० नोव्हेंबर) दुपारी चार वाजता दिल्लीचा हवा गुणवत्ता निर्देशांक ४३८ वर गेला होता. दिल्लीची गणना जगातील सर्वांधिक प्रदूषित शहर म्हणून होत आहे. जगातील पहिल्या दहा प्रदूषित शहरांमध्येही देशातील आठ शहरांचा समावेश होता.

राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (२० नोव्हेंबर) दुपारी चार वाजताच्या आकडेवारीनुसार दिल्ली जगातील सर्वांधिक प्रदूषित शहर होते. दिल्लीचा हवा गुणवत्ता निर्देशांक चार वाजता ४३२ वर गेला होता. हवेत २.५ मायक्रॉनच्या प्रदूषकांचे प्रमाण २९१, तर १० मायक्रॉनच्या प्रदूषकांचे प्रमाण ४१३, कार्बन मोनोऑक्साईडचे प्रमाण १२२९ पीपीबी, सल्फर डायऑक्साईचे प्रमाण ५ पीपीबी, नायट्रोजन ऑक्साईडचे प्रमाण २८ पीपीबी, ओझोन १० पीपीबी होते.

pune private hospital pollution
पुणे: खासगी रुग्णालयांवर कारवाईचा बडगा ! नियमांचे पालन न केल्याप्रकरणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे पाऊल
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Air quality deteriorated in Colaba Deonar Kandivali Mumbai news
कुलाबा, देवनार, कांदिवलीमधील हवा ‘वाईट’
Mumbai constituencies polluted, byculla, Shivdi,
मुंबईत चार मतदारसंघ प्रदूषित; भायखळा, शिवडी, देवनार, मानखुर्दच्या समस्येकडे सर्वपक्षिय दुर्लक्ष
mumbai weather updates city records moderate air quality
मुंबईतील हवेचा दर्जा मध्यम श्रेणीतच
Air Quality Index, air pollution, Uran city, raigad district
हवा प्रदूषणात उरण देशात तिसऱ्या क्रमांकावर, शहरातील नागरिकांना सर्दीखोकला तसेच श्वसनाचा त्रास
80 lakh cash worth rs 17 lakh mephedrone seized in pimpri chinchwad
पिंपरी-चिंचवडमध्ये ८० लाखांची रोकड, १७ लाखांचे मेफेड्रोन जप्त
Nagpur pollution latest news
दिवाळीत फटाके फुटले तरी प्रदूषण कमी, मात्र दिवाळी आटोपताच उपराजधानीत…..

दुसऱ्या क्रमांकावर उत्तर प्रदेशातील हापूर (हापुड) असून, हवा गुणवत्ता निर्देशांक ४२२ इतका होता. हवेत २.५ मायक्रॉनच्या प्रदूषकांचे प्रमाण २६३, तर १० मायक्रॉनच्या प्रदूषकांचे प्रमाण ४४७, कार्बन मोनोऑक्साईडचे प्रमाण १५५३ पीपीबी, सल्फर डायऑक्साईचे प्रमाण ८ पीपीबी, नायट्रोजन ऑक्साईडचे प्रमाण १२ पीपीबी, ओझोन १४ पीपीबी होते.

हेही वाचा >>> Maharashtra Elections 2024 : मतदान केंद्रच बदलले… मतदारयादीतील घोळामुळे दिव्यांग मतदारांना नाहक त्रास

तिसऱ्या क्रमांकावर चीनच्या हेलॉन्गजियांग प्रातांतील दकिंग शहर असून, वायू गुणवत्ता निर्देशांक ४०१ आहे. हवेत २.५ मायक्रॉनच्या प्रदूषकांचे प्रमाण २५२, तर १० मायक्रॉनच्या प्रदूषकांचे प्रमाण ३३०, कार्बन मोनोऑक्साईडचे प्रमाण १३१६ पीपीबी, सल्फर डायऑक्साईचे प्रमाण ६ पीपीबी, नायट्रोजन ऑक्साईडचे प्रमाण ३५ पीपीबी, ओझोन ८ पीपीबी होते. हवा निर्देशांकानुसार, ० ते ५० हवा निर्देशांक असेल तर चांगली हवा, ५० ते १०० निर्देशांक असेल तर समाधानकारक, १०० ते २०० निर्देशांक असेल तर मध्यम, २०० ते ३०० निर्देशांक असेल तर वाईट, ३०० ते ४०० निर्देशांक असेल तर अत्यंत वाईट, ४०० पेक्षा जास्त निर्देशांक असेल तर हवा अति धोकादायक मानली जाते.

हेही वाचा >>> Maharashtra Elections 2024 : घाटकोपरमध्ये तीन पिढ्यांनी केले एकत्रित मतदान

उत्तर भारतातील शहरे प्रदूषित

जगातील पहिल्या दहा सर्वांधिक प्रदूषित शहरांमध्ये भारतातील आठ शहरांचा समावेश आहे. दिल्ली पाठोपाठ उत्तर भारतातील अनेक शहरांतील हवेची गुणवत्ता वाईट किंवा अति धोकादायक पातळीवर पोहचली आहे. हवा गुणवत्ता निर्देशांकानुसार प्रदूषित शहरे (कंसात हवा गुणवत्ता निर्देशांक) नवी दिल्ली – ४३८, हापूर (उत्तर प्रदेश) – ४३०, भिवानी (हरियाणा) ४०४, दकिंग (चीन) ३९८, गुरुग्राम (हरियाणा) ३८३, गझियाबाद (उत्तर प्रदेश) – ३६५, सोनीपत (हरियाणा) ३५१, मेरठ (उत्तर प्रदेश) ३५१, अद दिरियाह (सौदी अरेबिया) ३४४, नोएडा (उत्तर प्रदेश) ३४१.

थंडी, दाट धुक्यांमुळे हवा बिघडली

गेल्या आठवड्याभरापासून दिल्लीसह उत्तर भारतात थंडी आणि दाट धुके पडत आहे. थंडी, दाट धुके आणि वाऱ्याचा प्रवाह मंद असल्यामुळे हवेत धुळीचे, धुराचे कण साचून राहतात. हवेची घनता जास्त असल्यामुळे दहा मायक्रॉनच्या वरील प्रदूषित कणही जमिनीवर लवकर पडत नाहीत. घनता वाढलेल्या हवेत धूर, धुळीचे कण, वाहनांच्या धुरातून बाहेर पडणारे लहान कण साचून राहतात. वाऱ्याचा प्रवाह मंद असल्यामुळे प्रामुख्याने शहरांवर प्रदूषित हवा जास्त काळ टिकून राहते. त्यामुळे उत्तर भारतातील शहरांचा हवा गुणवत्ता निर्देशांक बिघडला आहे. 

सुक्ष्म कण मानवी आरोग्याला घातक

थंडी, दाट धुक्यामुळे हवेची गुणवत्ता खालावते. हवेची आर्द्रता आणि घनता वाढल्यामुळे हवेत प्रदूषित कण जास्त वेळ टिकून राहतात. प्रामुख्याने २.५ मायक्रॉन किंवा त्यापेक्षा कमी (सुक्ष्म कण) आकाराचे प्रदूषित कण श्वासोच्छवासातून मानवी शरीरात सहजपणे जातात. त्यामुळे २.५ मायक्रॉनपेक्षा कमी आकाराचे कण मानवी आरोग्यास जास्त धोकादायक ठरतात, अशी माहिती हवामान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. एस. डी. सानप यांनी दिली.