साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाला सामाजिक प्रबोधानाच्या कार्यातील अग्रदूत प्रबोधनकार ठाकरे यांचे नाव द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडीने केली आहे. महाराष्ट्रातील सुमारे २०० सांस्कृतिक संस्था व संघटना या आघाडीत सहभागी आहेत. संमेलन व्यासपीठाला ठाकरे यांचेच नाव द्यायचे असेल तर ते कुणाचाच आक्षेप नसलेल्या प्रबोधनकारांचे द्यावे, अशी मागणी या आघाडीचे संयोजक डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी केली आहे. महात्मा फुले यांच्या प्रबोधन परंपरेतील सामाजिक कार्यकर्ते व लेखक हमीद दलवाई यांच्या घरापासून काढण्यात येणारी दिंडी रद्द करू नये, तसेच विशिष्ट उपजातीची प्रतिके वापरण्यास जो विरोध होत आहे, तो विचारात घेऊन ही प्रतिके मागे घ्यावीत, असे आवाहनही आघाडीने केले आहे. संमेलन व्यासपीठाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यास प्रा. पुष्पा भावे, कवयित्री प्रज्ञा दया पवार यांनी घेतलेल्या आक्षेपालाही या आघाडीने आपला पाठिंबा दर्शवला आहे.

Story img Loader