‘फेसबूक’वर बंदच्या विरोधात मतप्रदर्शन करणाऱ्या पालघरच्या शाहिन धडा आणि तिच्या मैत्रिण रेणू श्रीनीवासन हिच्यावर गुन्हा दाखल केल्याचा इंडिया अगेन्स करप्शनसह अनेक सामाजिक संघटनांनी निषेध केला आहे. त्यांच्यावरचे गुन्हे काढून ते दाखल करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
शाहिनच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा हा प्रयत्न असून राजकीय पक्षांच्या दबावामुळे गुन्हे दाखल केले जात असल्याबद्दही ‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’ने चिंता व्यक्त केली आहे. खुनाचा गुन्हा दाखल करण्यासाठीही वेळ घेतला जातो, मग पालघर पोलिसांनी एवढी तत्परता का दाखवली, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. जर फेसबूकवरील स्टेटसबद्दल गुन्हा दाखल होऊ लागला तर हजारो लोकांवर गुन्हे दाखल करावे लागतील, असेही त्यांनी म्हटले आहे. सामाजिक कार्यकर्त्यां तीस्टा सेटलवाड यांनीही या घटनेचा निषेध केला असून माहिती तंत्रज्ञान कायद्याचा गैरवापर करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
शाहीनचे फेसबूक खाते ‘हॅक’
फेसबूकवरील प्रतिक्रियेमुळे अटकेला सामोरे जावे लागलेल्या शाहीन दाढा हिचे फेसबूक खाते कुणीतरी हॅक केल्याचे स्पष्ट झाले आहे. जामिनावर सुटल्यानंतर खाते बंद करण्याचा प्रयत्न करणाऱ्या शाहीनला ते कॅलिफोर्निया येथून हॅक करण्यात आल्याचा संदेश आला आहे. माझ्या नावे बनावट खाते उघडण्यात आले आहे. त्यामुळे या खात्यावरून प्रतिक्रिया व्यक्त केली गेली तर आपण जबाबदार नसू. याबाबत पोलिसांत तक्रार केली आहे, असेही तिने सांगितले.
शाहीन धाडावरील गुन्हा मागे घेण्याची मागणी
‘फेसबूक’वर बंदच्या विरोधात मतप्रदर्शन करणाऱ्या पालघरच्या शाहिन धडा आणि तिच्या मैत्रिण रेणू श्रीनीवासन हिच्यावर गुन्हा दाखल केल्याचा इंडिया अगेन्स करप्शनसह अनेक सामाजिक संघटनांनी निषेध केला आहे.
First published on: 21-11-2012 at 05:39 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Demand for take back charges against shahin dhada