हिंदू देव-देवतांची विटंबना करणारे डॉ. झाकीर नाईक यांच्या ‘इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन’तर्फे मुंब्रा येथे येत्या १४ ते २३ डिसेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम रद्द करण्यात यावा, अशी मागणी हिंदूू जनजागृती समितीने केली आहे. डॉ. नाईक यांना तातडीने अटक करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही समितीचे समन्वयक शिवाजी वटकर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाव्दारे दिला आहे.
हिंदू देव-देवता, गुरु नानक, महंमद पैगंबर, मुसलमान सूफी संत, बौद्ध पंथ आदींच्या विरोधात आक्षेपार्ह व धार्मिक भावना दुखावणारी वक्तव्ये डॉ. नाईक यांनी या पूर्वी जाहीर कार्यक्रमातून केली असून त्यांच्या चित्रफिती ‘यू टय़ूब’ या संकेतस्थळावरही ठेवण्यात आल्या आहेत. श्री गणेशाचा अपमान केल्याप्रकरणी हिंदुत्ववादी संघटना व गणेशभक्तांनी संघटित होऊन मुंबईत चुनाभट्टी येथील सोमय्या मैदानात दरवर्षी डिसेंबर महिन्यात होणारा डॉ. नाईक यांचा कार्यक्रम रद्द करण्यास संबंधिताना भाग पाडले आहे. आता हा कार्यक्रम मुंब्रा येथे होत हा कार्यक्रम रद्द करावा, अशी मागणीही केली आहे.        

Story img Loader