मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या देशातील मोठमोठ्या प्रकल्पांचा उल्लेख करत त्यांच्याकडे एक मागणी केलीय. नितीन गडकरी देशात खूप मोठमोठे प्रकल्प करत असतात. आता त्यांनी देशात एक प्रचंड मोठा प्रकल्प करावा आणि त्याला लता मंगेशकर यांचं नाव द्यावं, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली. पंडीत ह्रदयनाथ मंगेशकर यांना झी २४ तासकडून अनन्य सन्मान जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला. यावेळी राज ठाकरे बोलत होते.

राज ठाकरे म्हणाले, “नितीन गडकरी देशात खूप मोठमोठे प्रकल्प देशात करत असतात. तुम्ही देशात एक प्रचंड मोठा प्रकल्प करावा आणि त्याला लता मंगेशकर यांचं नाव द्यावं. तो प्रकल्प इतका विलक्षण वेगळा असावा की त्याला दींदींचं नाव शोभलं पाहिजे.”

Ajit pawar maratha leader rising in Delhi
Ajit Pawar: अजित पवार दिल्लीतील नवे मराठा स्ट्राँगमॅन; खासदार सुनेत्रा पवार यांना शरद पवारांसमोरील बंगला मिळाल्यामुळे चर्चांना उधाण
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
When and where will flood-affected Ektanagari residents be relocated
पूरग्रस्त एकतानगरीचे होणार स्थलांतर नक्की कधी आणि कुठे?
local body government
राज्यात पुन्हा योजना, उद्घाटनांचा धडाका
nana patole
पैशाच्या जोरावर लोकशाही विकत घेण्याचा प्रयत्न म्हणजेच ‘ऑपरेशन लोटस’,पटोलेंचा घणाघात
Nana Patole
Nana Patole : “आमचे सर्व खासदार…”, महाराष्ट्रात ‘ऑपरेशन लोटस’च्या चर्चांवर नाना पटोलेंची प्रतिक्रिया
amazon smbhav 2024 nitin gadkari
देशातील वाहतूक खर्च निम्म्यावर आणणार – नितीन गडकरी
Maval MLA Sunil Shelke , Sunil Shelke, Paragliders,
मावळला मंत्रिपद मिळण्यासाठी महायुतीच्या नेत्यांना आकाशातून गवसणी, ११ पॅराग्लायडर्सनी ७०० फूट उंचीवरून …

“ही सगळी मंडळी देशात नसती तर या देशात कधीच अराजक आलं असतं”

“या देशात कलाकार, संगीतकार, गायक, नाट्यक्षेत्र, साहित्य, कवी, चित्रपट ही सगळी मंडळी देशात नसती तर या देशात कधीच अराजक आलं असतं. आपण या लोकांमध्ये गुंतून पडलो, आपण यांच्यावर प्रेम केलं, आपण त्यांच्यात आत शिरलो म्हणून इतर वाईट गोष्टींकडे आपलं दुर्लक्ष झालं. या लोकांचे आभार मानावे तर कसे मानावेत हेच मला समजत नाही. मी अनेकदा मंगेशकरांची गाणी ऐकत असतो. इतकी विविध गाणी मराठीत कोणी दिली असतील असं मला वाटत नाही. हिंदीत पण मोजकेच,” असं राज ठाकरे यांनी सांगितलं.

“…तो अल्लाह एखाद्या मुसलमानाला देखील लावता येणार नाही”

राज ठाकरे म्हणाले, “मी जेव्हा शिवतीर्थावर दीदींचा एक कार्यक्रम केला तेव्हा दीदी आणि पंडीतजी दोघांनी ‘रसलुल्ला’ ही एक बंदीश गायली होती. मी आजही ठामपणे सांगू शकतो की रसलुल्लामध्ये पंडीतजी ज्यावेळी अल्लाह लावतात तो अल्लाह एखाद्या मुसलमानाला देखील लावता येणार नाही इतका शुद्ध अल्लाह पंडितजींकडून लागला गेला होता. त्याला सूर लागणं म्हणतात.”

हेही वाचा : पश्चिम बंगालचा संदर्भ देत राज ठाकरेंनी लता मंगेशकरांसंदर्भात केली मागणी; म्हणाले, “मंत्रालयामध्ये…”

“मी त्यांच्याकडून अनेक गोष्टी ऐकल्या आहेत. सूर कसा लागतो, सूर कसा असतो, नेमका सूर कसा असतो,” असं म्हणत राज ठाकरे यांनी पंडीत ह्रदयनाथ मंगेशकर यांच्या कर्तुत्वाबद्दल गौरवोद्गार काढले.

Story img Loader