योग्य ती कार्यवाही करण्याचे अतिरिक्त आयुक्तांचे आदेश

मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा विभागातील विशेष कार्य अधिकारी पदावरून सेवा निवृत्त झाल्यानंतरही ओळखपत्र दाखवून कर्मचाऱ्यांवर अधिकार गाजवणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध महानगरपालिका प्रशासनाकडे तक्रार करण्यात आली आहे. याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशीही मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणी योग्य ती कार्यवाही करावी, असे निर्देश देत अतिरिक्त आयुक्तांनी ही तक्रार उपायुक्तांकडे पाठवली आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा विभागातील विशेष कार्य अधिकारी सुभाष दळवी हे ३१ मार्च रोजी सेवानिवृत्त झाले. मात्र अजूनही ते महानगरपालिकेच्या घनकचरा विभागात कार्यरत आहेत. त्यांची नुकतीच महाराष्ट्र स्वच्छता अभियानाचे राज्य समन्वयक म्हणूनही नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र मुंबई महानगरपालिकेच्या सेवेतून निवृत्त झालेले असताना दळवी कर्मचाऱ्यांवर अधिकार कसे काय गाजवू शकतात, ओळखपत्राचा वापर कसा करू शकतात अशा तक्रारी कर्मचाऱ्यांनी केल्या आहेत. त्याची दखल घेऊन प्रशासनाने कारवाईचे करण्याचे आदेश दिले आहेत.

SEZ company objected to decision to return land purchased by farmers
उरण : जमिनी शेतकऱ्यांना परत करण्यास सेझ कंपनीची हरकत,पुढील सुनावणी ९ ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलली
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Crime against office bearers of society in Aundh for excommunicating a computer engineer
संगणक अभियंत्याला बहिष्कृत केल्याप्रकरणी औंधमधील सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा, न्यायालयाच्या आदेशाने कारवाई
unauthorized hawkers, Andheri,
अंधेरीतील अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाईचा बडगा; परिसर फेरीवालामुक्त करण्यासाठी पालिकेची कार्यवाही
Offense against municipal employee refusing to sign Panchnama
पिंपरी : पंचनाम्यावर स्वाक्षरी करण्यास नकार देणार्‍या महापालिका कर्मचार्‍यावर गुन्हा
Extortion from businessmen, retired officers, Food and Drug Administration
अन्न व औषध प्रशासन खात्यातील निवृत्त अधिकाऱ्यांमार्फत भीती दाखवून व्यावसायिकांकडून वसुली
deepak kesarkar
भूमिगत बाजारपेठेबाबत अधिकाऱ्यांची चालढकल
A case has been filed against 15 people including an official employee contractor in the case of embezzlement in Malegaon Municipal nashikS
मालेगाव मनपातील अपहार प्रकरणी अधिकारी-कर्मचारी, ठेकेदारासह १५ जणांविरुध्द गुन्हा – लाचलुचपत प्रतिबंधकची कारवाई

हेही वाचा >>>Apple First Retail Store Opening: मुंबईत सुरू झालेल्या देशातील पहिल्या अ‍ॅपल स्टोअरबद्दल जाणून घ्या ‘या’ १० प्रमुख गोष्टी

दरम्यान, दळवी यांच्या नियुक्तीच्या वेळी जन्मतारखेचा घोळ झाल्यामुळे ते एक वर्ष आधीच निवृत्त झाले होते. मात्र २०११ मधील एका परिपत्रकानुसार त्यांनी जन्मतारखेचा घोळ सुधारण्याबाबत अर्ज सादर केला होता. त्याला सेवा अभिलेखात मान्यता मिळाल्याचे संबधित अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र महानगरपालिकेच्या सॅप प्रणालीत ते सेवा निवृत्त असल्याचेच दाखवत आहेत. जन्म तारखेतील सुधारणेनुसार दळवी हे २०२५ मध्ये निवृत्त होणार असल्याचे समजते. याबाबत घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या उपायुक्तांशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत आपल्याला काहीच कल्पना नसल्याचे सांगितले. तर सुभाष दळवी यांच्याशी वारंवार संपर्क साधूनही त्यांनी प्रतिसाद दिला नाही.