पुरोगामी विचारवंत कॉम्रेड गोिवद पानसरे यांच्या हत्येमुळे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधी पक्षांकडून केली जात असताना ‘गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात विरोधकांची चूक नाही,’ अशी खरमरीत टीका शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना केली आहे. अ‍ॅड. पानसरे यांची हत्या होऊन मारेकरी न सापडणे, हे सरकारला शोभणारे नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.
मुख्यमंत्र्यांना गृहखाते सांभाळता येत नसल्याने आणि अन्य खात्यांच्या कार्यभारामुळे गृहखात्यासाठी वेळ देता येत नसल्याने पूर्णवेळ गृहमंत्री राज्याला द्यावा, अशी मागणी होत आहे. शिवसेनेने त्याचेही समर्थन केले असून ही जनभावना असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर विरोधी पक्षात असलेल्या फडणवीस यांनी तत्कालीन गृहमंत्री आर.आर. पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यामुळे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आदींनी मुख्यमंत्री फडणवीस आता राजीनाम्याबाबत कोणती भूमिका घेणार, अशी विचारणा केली आहे. या पाश्र्वभूमीवर सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेकडूनही विरोधकांच्या मागणीत चूक नसून आम्ही त्या वेळी हेच केले होते, ते विरोधी पक्षांचे कामच आहे, अशी भूमिका घेण्यात आली आहे. शिवसेनेच्या या भूमिकेमुळे मुख्यमंत्र्यांवरील दबाव आणखी वाढणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा