मुंबई : काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने महिलांसाठी ‘लाडकी बहीण’ ही योजना सुरू केली असून या योजनेत आधारकार्ड महत्त्वाचा पुरावा आहे. मात्र अनेकांच्या आधारकार्डावर काही चुका असून दुरुस्तीसाठी खासगी आधारकार्ड केंद्र चालक मोठ्या प्रमाणात लूट करीत आहेत. ५० ते १०० रुपये शुल्क असताना ५०० रुपये ते दोन हजार रुपये घेण्यात येत आहेत. महिलांची लूट करणाऱ्यांविरोधात सरकारने कडक कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्य सरकारने जुलै महिन्यात ‘लाडकी बहीण’ योजना सुरू केली. या योजनेनुसार राज्यातील महिलांना दरमहा (पान ८ वर)(पान १ वरून) १५०० रुपये देण्यात येणार असून यासाठी महिलांना आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड, रहिवासी प्रमाणात आणि उत्पनाचा दाखल सादर करणे बंधनकारक आहे. ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर महिलांच्या खात्यात हे पैसे जमा होणार आहेत. मात्र अनेक जणींच्या आधाराकार्डमध्ये काही चुका आहेत. त्यांच्या दुरुस्तीसाठी महिलांना आधार केंद्रांवर हेलपाटे मारावे लागत आहेत. याचा फायदा घेत खासगी आधार केंद्र चालक महिलांची मोठी लूट करीत आहेत. टपाल कार्यालय अथवा बँकांमधील आधार केंद्रांवर नाव दुरुस्ती, मोबाइल नंबर जोडणे आणि इतर दुरुस्तीसाठी केवळ ५० ते १०० रुपये घेण्यात येत आहेत. मात्र खासगी आधार केंद्रांमध्ये याच कामांसाठी ५०० रुपये ते दोन हजार रुपये मागितले जात आहेत.

हेही वाचा >>>गोविंदांना विमा संरक्षणासाठी अर्ज भरण्याचे आवाहन, २४ ऑगस्टपर्यंत अर्ज भरता येणार

एका खासगी आधार केंद्रात मोबाईल नंबर कार्डला जोडण्यासाठी ५०० रुपये मागण्यात आले. मात्र टपाल कार्यालयातील हेच काम ५० रुपयात झाल्याचा अनुभव मालती वाघमारे यांनी सांगितला. ‘लाडकी बहीण’ योजना झाल्यानंतर अर्ज भरून घेण्यासाठी महिलांकडे पैसे मागण्यात आले होते. प्रसारमाध्यमांनी याबाबत वृत्त प्रसिद्ध करताच सरकारने कारवाई केली. अशीच कारवाई खासगी आधार केंद्रांवरही करण्याची मागणी होत आहे.

सरकारी केंद्रांची क्षमता वाढवा 

टपाल कार्यालये अथवा बँकांमधील आधार केंद्रांवर दिवसभरात केवळ ५० जणांना नंबर देऊन दुरुस्तीची कामे केली जातात. त्यामुळे नाईलाजस्तव महिलांना खासगी आधार केंद्रांवर जावे लागत असल्याची तक्रार आहे. सरकारने टपाल कार्यालये, महापालिका कार्यालये आणि बँकेतील आधार केंद्रांची संख्या किंवा क्षमता वाढवावी, अशी मागणी महिलांकडून करण्यात येत आहे.

माझ्या जन्मतारखेमध्ये चूक असल्याने पहिल्यांदा टपाल कार्यालयात गेले. तेथे अनेक पुरावे मागितले. ते पुरावे नसल्याने मी चेंबूरच्या एका खासगी आधार केंद्रावर गेले. मात्र त्या कामासाठी माझ्याकडे दीड हजार रुपये मागण्यात आले.- मालती शिंदे

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Demanding huge amount from private aadhaar centers for rectification of mistakes amy