मुंबई : धारावीतील मशिदीवरील तोडक कारवाईवरून राजकीय वातावरण चांगलेच तापलेले असताना या मशिदीचा अनधिकृत भाग तोडण्यास सोमवारपासून सुरूवात करण्यात आली आहे. ट्रस्टने स्वतःहूनच मशिदीचा वरचा भाग तोडण्यास सुरुवात केली. दहा फूटापर्यंतचा भाग सोडून वरचे तीस फुटाचे बांधकाम तोडावे लागणार असून त्याला चार पाच दिवस लागण्याची शक्यता आहे.

धारावी येथील ९० फूट रस्त्यावरील मेहबूबे सुभानिया या मशिदीचे अतिक्रमित बांधकाम पाडण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विभाग कार्यालयाचे पथक गेल्या आठवड्यात धारावीत गेले होते. ही साधारण २५ वर्षे जुनी मशिद असल्याचे समजते. मशिदीच्या पाडकामावरून परिसरात चांगलाच तणाव निर्माण झाला होता. पालिकेच्या गाड्या अडवण्यात आल्या होत्या. प्रशासनाने मशिदीशी संबंधित ट्रस्टला नोटीस बजावली होती. त्यानंतर कारवाई हाती घेतली होती. अतिक्रमित बांधकाम काढण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने चार ते पाच दिवसांची मुदत द्यावी. या मुदतीच्या कालावधीत स्वतःहून बांधकाम हटवण्यात येईल, अशी लेखी विनंती मशिदीच्या विश्वस्तांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे परिमंडळ २ चे उपआयुक्त आणि जी उत्तर विभागाचे सहायक आयुक्तांकडे केली. त्यानंतर ही कारवाई थांवण्यात आली होती.

Morya Gosavi Sanjeev Samadhi Festival begins in chinchwad Pune news
पिंपरी: मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवाला मंगळवारपासून प्रारंभ; सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची उपस्थितीती
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Mehkars Circuit youth detained for providing false information about emergency alert system
‘मंदिरावर हल्ला झाला’! ‘त्या’ क्रमांकावर संदेश आल्याने पोलिसांची धावपळ, प्रत्यक्षात…
police action on massage parlour misbehavior is going on in name of massage parlour
मसाज पार्लरच्या नावाखाली गैरप्रकारांवर कारवाईचा बडगा, वर्षभरात पोलिसांकडून ३३ गुन्हे दाखल
BJPs grand convention at Chhatrapati Sambhajinagar in the presence of Prime Minister Narendra Modi
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत भाजपचे छत्रपती संभाजीनगरला महाअधिवेशन
Woman police officer abused for not taking action on vehicle
पिंपरी : कारवाई करू नये म्हणून महिला पोलिसाला शिवीगाळ
29 villages, Vasai, Vasai latest news, Vasai marathi news,
वसई : २९ गावांचे प्रकरण तापले, सुनावणीची प्रक्रिया बेकायदेशीर असल्याचा आरोप
Illegal building on road in Nandivali Samarth Chowk demolished
मानपाडा-बाह्यवळण रस्ता ते कोपर रस्त्यामधील अडथळा दूर

हेही वाचा – ‘इमर्जन्सी’ चित्रपटातील दृश्यांना कात्री लावण्यास सहनिर्माती कंगना राणावत तयार, सेन्सॉर मंडळाची उच्च न्यायालयात माहिती

या कारवाईचे राजकीय पडसादही उमटले होते. समाजवादी पक्षाने व कॉंग्रेस पक्षाने या कारवाईला विरोध केला होता. अनेक आरोप-प्रत्यारोपांमुळे हे प्रकरण तापले होते. पालिकेने दिलेली पाच दिवसांची मुदत संपल्यानंतर आता काय होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. अत्यंत संवेदनशील अशा या प्रकरणात मुंबई महापालिका प्रशासनाने तोडक कारवाई सुरू केली असती तर तणाव वाढण्याची शक्यता होती. मात्र रविवारपासून ट्रस्टच्या सदस्यांनी मशिदीच्या तोडक कारवाईची पूर्वतयारी सुरू केली होती. मशिदीच्याभोवती हिरवे कापड लावून बांधकाम तोडण्याचे काम सोमवारपासून सुरू करण्यात आले आहे. सोमवारी सकाळी मशिदीचे घुमट तोडण्यास सुरूवात झाली, अशी माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

हेही वाचा – मुंबई : राम मंदिर – गोरेगाव – मालाड विभागात वेगमर्यादा

या कामात पालिकेचे मनुष्यबळ वापरले नसले तरी पालिकेची यंत्रणा या कामावर लक्ष ठेवून आहे, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. मशिदीच्या जागेवर तीन घरांचे फोटो पास आहेत. त्या जागेवर ही चाळीस फूट मशीद बांधण्यात आली आहे. दहा फुटापर्यंतचे बांधकाम ठेवून वरचे तीस फुटाचे बांधकाम पाडण्याबाबतची नोटीस मशिदीला देण्यात आली होती. त्यानुसार ही कारवाई सुरू असल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

Story img Loader