नायगाव बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यातील मोठा अडथळा अखेर दूर झाला आहे. येथील इमारत क्रमांक १७ आणि १८ पूर्णपणे रिकाम्या करून घेण्यात म्हाडाच्या मुंबई मंडळाला अखेर यश आले आहे. या दोन इमारतींच्या पाडकामाला गुरुवारपासून सुरुवात करण्यात आली. लवकरच पहिल्या टप्प्यातील उर्वरित इमारती रिकाम्या करून त्यांचे पाडकाम सुरू करण्यात येईल, असे मुंबई मंडळातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा- येत्या २१ नोव्हेंबरपासून पश्चिम रेल्वेवरील १५ डब्बा लोकलच्या २६ फेऱ्या वाढणार

pune metropolis have lack of basic facilities and infrastructure
बकालीकरणाकडे…
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Patra Chawl Redevelopment Project
विश्लेषण: पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्प अखेर मार्गी लागणार… विलंब का? लाभ कुणाला मिळणार?
Engravings on the wheels
चित्रास कारण की: जमिनीवरची मेंदी
manipur violence 10 militants killed in encounter with crpf
अन्वयार्थ : अशांत मणिपूर, अस्वस्थ नागालँड
readers feedback on loksatta editorial
लोकमानस : कणा आणखी किती भार सोसणार?
redevelopment plan of dharavi
धारावीविषयी नवा दृष्टिकोन हवा!

बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचे कार्यादेश जारी करून पाच वर्षे झाली तरी नायगाव आणि ना. म. जोशी मार्ग बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही. नायगाव येथे ४२ इमारती असून पहिल्या टप्प्यात येथे बांधकाम सुरू करण्यासाठी आवश्यक त्या इमारती रिकाम्या करण्यास मुंबई मंडळाने सुरुवात केली. मात्र रहिवाशांकडून अनेक मुद्द्यांवरून स्थलांतरास विरोध होत होता. दोन इमारती रिकाम्या करून त्यांचे पाडकाम पूर्ण करणे मंडळा शक्य झाले. मात्र इमारत क्रमांक १७ आणि १८ रिकाम्या करण्यात यश येत नव्हते. या इमारतीत पोलीस कुटुंबाचे वास्तव्य होते. आधी पोलिसांना घरे देण्याचे धोरण नसल्याने आणि नंतर धोरण जाहीर झाल्यानंतर कराराचा मुद्दा प्रलंबित असल्याने इमारती रिकाम्या करून घेणे मंडळाला शक्य होत नव्हते. निष्कासनाच्या नोटिसीनंतरही या इमारती रिकाम्या करण्यात येत नव्हत्या.

हेही वाचा- …तर एकपडदा चित्रपटगृह बंद करावी, चित्रपटगृहांच्या मालकांचीच मागणी

आता मात्र मंडळाने सर्व रहिवाशांना स्थलांतरित करून इमारती रिकाम्या करून घेतल्या आहेत. या दोन्ही इमारतींच्या पाडकामाला गुरुवारपासून सुरुवात करण्यात आल्याची माहिती मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. आता उर्वरित इमारतीही लवकरच पाडून पहिल्या टप्प्यातील इमारतींच्या प्रत्यक्ष बांधकामास सुरुवात करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.