मीरा- भाईंदरमध्ये डेंग्यूचा प्रादुर्भाव झाला असून विश्वनाथ गोविंद साहू (४२) या रुग्णाचा पहिला बळी या पावसाळ्यात गेला आहे.
मंगलनगरमधील रश्मीवृष्टांत इमारतीतील विश्वनाथ हे २९ जून रोजी भक्तिवेदांत रुग्णालयात दाखल झाले होते. बुधवारी सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला. पालिकेचे वैद्यकीय अधिकारी प्रमोद पडवळ यांनी मात्र विश्वनाथ हे केवळ डेंग्यूचे संशयित रुग्ण होते असे म्हटले आहे. जानेवारीपासून डेंग्यूच्या सात संशयितांचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले होते. त्यापेकी एकाला डेग्यूंची लागण झाली होती, असे स्पष्ट झाले आहे. गेल्या आठवडय़ात पुन्हा सात नमुने तपासणीसाठी पाठविले आहेत. त्यांचा अहवाल प्राप्त झाला नसल्याचे डॉ. पडवळ यांनी सांगितले.