डेंग्यू डासांच्या उत्त्पत्तीची ठिकाणे शोधण्याची मोहीम पालिकेने हाती घेतल्यावर दोन आठवडय़ात १२८८ ठिकाणी या डासांची पैदास होत असल्याचे दिसून आले. मुख्य म्हणजे ही ठिकाणे उच्चभ्रू वस्तीमध्ये आढळली.
मलेरिया आणि डेंग्यू या संसर्गजन्य आजारांचे प्रमाण उच्चभ्रू वस्तींमधील रहिवाशांमध्ये अधिक असल्याचे दिसून येत आहे. महानगरपालिकेच्या आरोग्य विभागानेही उच्चभ्रू वस्तीमध्ये डासांच्या उत्पत्तीस्थानाविषयी जागृती करण्यास सुरुवात केली. त्याचसोबत डासांच्या उत्पत्ती स्थानांचा शोध घेऊन ती नष्ट करण्याचे प्रयत्न सुरू केले. गेल्या १५ दिवसांत पालिकेने ८८४ इमारतींमधील १२८८ ठिकाणी डासांची उत्पत्तीस्थाने शोधून काढली. यातील बहुतांश जागा उत्तर मुंबईतील दहिसर ते मालाड भागातील आहेत. मलेरिया तसेच डेंग्यूचा प्रसार करणाऱ्या डासांची उत्पत्ती स्वच्छ पाण्यात होते. कुंडय़ाच्या खालील ताट, फुलदाणी, टेरेसवर पाणी साचण्याच्या जागा येथेही डासांची पैदास होऊ शकते.

Story img Loader