मुंबई : पशुसंवर्धन विभाग (महाराष्ट्र शासन) आणि मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यामाने मुंबईत २१ व्या पशुगणनेला २५ नोव्हेंबरपासून सुरुवात झाली आहे. ही पशुगणना २८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत सुरू राहणार असून पशुगणनेसाठी येणाऱ्या प्रगणकांना नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा…शिष्यवृत्ती संदर्भात अर्ज तात्काळ भरा

केंद्र सरकारच्या निर्देशानुसार, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाच्या वतीने दर पाच वर्षांनी पशुधनाची गणना केली जाते. पशुसंवर्धन विभाग (महाराष्ट्र शासन) आणि मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यामाने मुंबईत मोबाईल अॅप्लिकेशनच्या मदतीने पशुगणना करण्यात येते आहे. घरोघरी प्रत्यक्ष भेटी देऊन पशुपालकांची घरगुती, घरगुती उद्याोग आणि गैर-घरगुती उपक्रम इत्यादींमध्ये वर्गवारी करण्यात येत . तसेच, पशुपालकांकडील उपलब्ध प्राण्यांच्या प्रजाती (उदा. कुत्रे, गुरे, म्हैस, मेंढी, शेळी, कुक्कुट पक्षी) यांचे वय, लिंग जातीनुसार नोंद करण्यात येत आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Department of animal husbandry and bmc 21 st livestock census began on november 25 in mumbai by animal husbandry department mumbai print news sud 02