मुंबई : सांस्कृतिक कार्य विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या रंगभूमी जीवनगौरव पुरस्काराची गुरुवारी घोषणा करण्यात आली. २०२०-२१ साठीचा नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार सतीश आळेकर यांना तर, २०२१-२२ साठीचा पुरस्कार दत्ता भगत यांना जाहीर करण्यात आला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२०२०-२१ चा संगीताचार्य कै. बळवंत पांडुरंग तथा अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार दीप्ती भोगले यांना तर, २०२१-२२ साठीचा पुरस्कार सुधीर ठाकूर यांना जाहीर करण्यात आला. या दोन्ही पुरस्कारांचे स्वरूप पाच लाख रुपये रोख, मानचिन्ह व मानपत्र असे आहे. याचप्रमाणे सांस्कृतिक कार्य विभागामार्फत २०१९ आणि २०२० या वर्षांसाठीचे राज्य सांस्कृतिक पुरस्कारही जाहीर करण्यात आले आहेत. राज्य सांस्कृतिक पुरस्कारातील मराठी नाटक कलाक्षेत्रासाठी २०१९ साठीचा पुरस्कार कुमार सोहोनी यांना तर  २०२० साठीचा पुरस्कार गंगाराम गवाणकर यांना जाहीर करण्यात आला.

कंठसंगीतासाठी अनुक्रमे पंडितकुमार सुरुशे आणि कल्याणजी गायकवाड यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. उपशास्त्रीय संगीतासाठी शौनक अभिषेकी आणि देवकी पंडित यांना जाहीर करण्यात आला. मराठी चित्रपटासाठी २०१९ चा पुरस्कार मधु कांबीकर यांना तर, २०२०चा पुरस्कार वसंत इंगळे यांना जाहीर करण्यात आला.

कीर्तनासाठी ज्ञानेश्वर वाबळे आणि गुरुबाबा औसेकर, शाहिरीसाठी अवधूत विभूते आणि दिवंगत कृष्णकांत जाधव (मरणोत्तर) यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला. नृत्यासाठी शुभदा वराडकर, जयश्री राजगोपालन यांना, कलादानासाठी अन्वर कुरेशी, देवेंद्र दोडके यांना तर, वाद्यसंगीतासाठी सुभाष खरोटे आणि ओंकार गुलवडी यांना जाहीर करण्यात आला आहे.

लोककलेसाठी सरला  नांदुलेकर, कमलाबाई शिंदे यांना पुरस्कार..

तमाशासाठी शिवाजी थोरात, सुरेश काळे यांना, लोककलेसाठी सरला नांदुलेकर, कमलाबाई शिंदे यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला. आदिवासी गिरीजनसाठीचा पुरस्कार मोहन मेश्राम आणि  गणपत मसगे यांना जाहीर करण्यात आला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Department of cultural affairs announced lifetime achievement award in theater zws