पालिकेच्या शिक्षण विभागात तब्बल ३३ टक्के पदे रिक्त आहेत. शिक्षण विभागात अ, ब, क आणि ग श्रेणीतील ७०८ पदे आहेत. मात्र त्यातील तब्बल २२८ पदे रिक्त आहेत. आजघडीला उपशिक्षणाधिकाऱ्यांची पाच, प्रशासकीय अधिकाऱ्यांची (शाळा) सहा, अधिक्षक (शाळा) १०, लिपिक ४६, मुख्य लिपिक २३, तर निरीक्षकांची (शाळा) ३४ पदे रिक्त आहेत. शिक्षणाबरोबरच संगीत, गायन, वादन, कला आणि शारिरीक शिक्षणालाही महत्त्व देण्यात आले आहे. मात्र या कामासाठी असलेले निदेशक पद रिक्त आहेत.अथक सेवा संघाचे अध्यक्ष अनिल गलगली यांनी माहितीच्या अधिकारात ही बाब उघड केली. याबाबत गलगली यांनी पालिका आयुक्त, उपायुक्त  आणि शिक्षणाधिकाऱ्यांना पत्र पाठवले आहे.

Story img Loader