मुंबई : ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात आरोपीची मालमत्ता जप्त करण्यासाठी न्यायालयात ३० दिवसांत अर्ज करणे आवश्यक असताना तशी काळजी घेतली जात नसल्यामुळे जप्तीची प्रक्रिया रखडून ठेवीदारांना फटका बसतो. याबाबत न्यायालयाने चपराक दिल्यानंतर राज्य शासनाने विशेष परिपत्रक काढून कालमर्यादा कसोशीने पाळण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय सक्षम प्राधिकाऱ्यांनी या संदर्भात न्यायालयीन सुनावणीच्या वेळी न चुकता हजर राहण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. त्यामुळे ठेवीदारांची बुडालेली गुंतवणूक परत मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.

हेही वाचा >>> ‘सन्मानाने मृत्यू’साठी मार्गदर्शक तत्त्वे; अंमलबजावणीसाठी समिती

Tax revenue is vital for civic services and property tax ensures
करभरणा प्रक्रिया सुलभ करण्यासाठी प्रयत्न गरजेचे, महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांची सूचना
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
mumbai police chief vivek phansalkar news in marathi
मुंबईतील वित्तीय, गुंतवणूक संस्थांची माहिती गोळा करा; मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांचे आदेश
illegal constructions Mumbai
मुंबई : अनधिकृत बांधकामांवर २०० टक्के दंड, अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांचे निर्देश
mumbai torres jewellers loksatta news
टोरेस फसवणूकप्रकरणी पोलीस ठाण्यासमोर गर्दी, ठेवीच्या परतफेडीसंदर्भात हजारो गुंतवणूकदारांचे अर्ज
Maharashtra Sadan not available for Sahitya Sammelan Delay for four months on fee issue Nagpur news
साहित्य संमेलनासाठी महाराष्ट्र सदन मिळेना! शुल्काच्या मुद्द्यावर चार महिन्यांपासून खल
Dabholkar murder case Objection to Dabholkar familys appeal against release of accused
दाभोलकर हत्या प्रकरण : आरोपींच्या सुटकेविरोधातील दाभोलकर कुटुंबीयांच्या अपिलाला आक्षेप
Court orders on state government officials regarding land compensation
‘भरपाई टाळण्यासाठी कायद्याचे बेधडक उल्लंघन’; राज्य सरकारी अधिकाऱ्यांवर न्यायालयाचे ताशेरे

ठेवीदारांच्या हितरक्षणासाठी राज्याने महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील) हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम १९९९ हा कायदा केला आहे. या कायद्यानुसार ठेवीदारांची फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला जातो. याअंतर्गत आरोपीची मालमत्ता जप्त करणे व त्याचा लिलाव करून ठेवीदारांना बुडालेली गुंतवणूक परत मिळण्याची शक्यता असते. मात्र शासनाकडून जप्ती आदेश जारी केल्यानंतरही सक्षम प्राधिकाऱ्यांकडून विहित मुदतीत अर्ज केला जात नाही. या काळात ही मालमत्ता विकली गेल्यास ती जप्त करणे अशक्य होते वा न्यायालयीन मार्गाचा अवलंब करावा लागतो. त्याला विलंब लागत असल्यामुळे ठेवीदारांनाही बुडालेल्या गुंतवणुकीचा परतावा मिळण्यात अडचण निर्माण होते.

आदेश काय?

●सक्षम प्राधिकाऱ्यांनी प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेऊन ती निकालात काढावीत

●विविध न्यायालयांमध्ये प्रलंबित प्रकरणांमध्ये सक्षम प्राधिकाऱ्यांनी जातीने हजर राहावे

●जप्त मालमत्तांच्या विक्रीनंतर ठेवीदारांना देय रकमा वितरित करण्यासाठी पुढाकार घ्यावा

●सक्षम प्राधिकाऱ्यांकडून संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी वेळोवेळी आढावा घ्यावा

Story img Loader