मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार हे अनुपस्थित असतानाच,  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सायंकाळी केंद्रातील भाजप नेत्यांच्या भेटीसाठी नवी दिल्लीला रवाना झाल्याने राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क व्यक्त करण्यात येऊ लागले. 

अजित पवार यांची प्रकृती चांगली नसल्याने ते मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थित नव्हते. त्यावरून उगाचच वेगळे अर्थ काढू नका, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मात्र अजित पवार यांच्या अनुपस्थिती ‘राजकीय आजार’ असल्याची टिप्पणी केली आहे. अजित पवार हे पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या रखडल्याने नाराज असल्याचेही बोलले जात आहे. दैनंदिन कार्यक्रमानुसार पवार सकाळी ९.४५ ते सायंकाळी ४.३० पर्यंत  मंत्रालयात उपस्थित राहणार होते. मात्र तब्येत बरी नसल्याचे कारण देत ते मंत्रालयात आलेच नाहीत. दिवसभर ते ‘देवगिरी’ या शासकीय निवासस्थानी होते. सकाळी त्यांनी गाठीभेटी घेतल्याचे समजते. घशाचा संसर्ग झाल्याने त्यांनी दिवसभर विश्रांती घेतली. रात्री पवार यांच्या शासकीय निवासस्थानी राष्ट्रवादीचे मंत्री व आमदारांची बैठक आयोजित करण्यात आली होती. प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे आदी नेत्यांच्या उपस्थितीत पक्षाची बैठक पार पडली. पण अजित पवार बैठकीला उपस्थित नव्हते.

Eknath Shinde on Santosh Deshmukh Murder Case
Eknath Shinde: “कुणाचेही लागेबंधे असले तरी…”, संतोष देशमुख प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा इशारा
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
from former Chief Minister Prithviraj Chavan Question over responsible for the extortion cases in the state
राज्यातील खंडणीच्या प्रकारांना मुख्यमंत्री, गृहमंत्री नव्हे तर कोण जबाबदार ? माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची विचारणा
ramesh mantri
पडसाद : रमेश मंत्री यांची निवड त्यांच्या साहित्यिक कारकीर्दीच्या आधारेच!
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : “आम्ही ‘वार’ आडनाव असलेल्यांचा सन्मान करतो, कारण…”, मुनगंटीवार, वडेट्टीवारांचा उल्लेख करत फडणवीस काय म्हणाले?
dharmaraobaba atram reaction on getting minister post
मी शंभर टक्के मंत्री होणार, पण अडीच वर्षाने, धर्मरावबाबा आत्राम म्हणाले…
some bad decisions happened on eknath shinde tenure as chief minister says forest minister ganesh naik
एकनाथ शिंदे यांच्या कालखंडात काही चुकीच्या गोष्टी घडल्या; वनमंत्री गणेश नाईक यांचे विधान
What Bajrang Sonawane Said?
Bajrang Sonawane : अजित पवारांच्या पक्षाकडून ऑफर आली का? विचारताच बजरंग सोनावणे म्हणाले, “आम्ही आठही खासदार….”

हेही वाचा >>>“दादरच्या प्राणी संग्रहालयावर कोणता राजकीय वरदहस्त?” तरणतलावात मगर आढळल्याने मनसेचा सवाल

अजित पवार यांच्या अनुपस्थितीची चर्चा असतानाच मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस हे सायंकाळी नवी दिल्लीला रवाना झाले. या भेटीत शिंदे व फडणवीस हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेणार आहेत. राज्यातील राजकीय परिस्थितीबाबत चर्चा करण्यासाठी दिल्लीवारी असल्याचे सांगण्यात आले. पितृपंधरवडा असल्याने राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लगेचच होण्याची शक्यता नाही.

राष्ट्रवादीच्या मंत्र्यांकडे अद्यापही पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोपविण्यात आलेली नसल्याने अजितदादा नाराज असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादीच्या मंत्र्यांकडे लवकरात लवकर पालकमंत्रीपद सोपवावे, अशी मागणी त्यांनी शिंदे व फडणवीस यांच्याकडे  केल्याचे समजते.

Story img Loader