मुंबई : जपान सरकारने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘शासकीय अतिथी’ (स्टेट गेस्ट) हा विशेष दर्जा देऊन आमंत्रित केले आहे. फडणवीस यांनी निमंत्रणाचा स्वीकार केला असून ते २० ऑगस्टपासून जपान दौऱ्यावर जात आहेत. यापूर्वी २०१३ साली गुजरातचे तत्कालिन मुख्यमंत्री आणि विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर राज्य पातळीवरील एखाद्या नेत्याला हा मान मिळण्याची ही पहिलीच घटना आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

फडणवीस या दौऱ्यात जपानचे अर्थमंत्री, परराष्ट्र व्यवहारमंत्री, व्यापारमंत्री व पर्यटनमंत्री यांच्याशी चर्चा करतील. तसेच ‘जायका’, ‘जेट्रो’ यासारख्या आंतरराष्ट्रीय वित्तसंस्थांचे उच्चपदस्थ अधिकारी, विदेशी गुंतवणूकदार तसेच जपान-इंडिया असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांबरोबर त्यांच्या अत्यंत महत्त्वपूर्ण बैठका होणार आहेत. राज्यात मेट्रोसह अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांना ‘जायका’ने अर्थसहाय्य केले आहे.

आगामी काळातही राज्यात आर्थिक गुंतवणूक करण्याबाबत सुमिटोमो, एनटीटी, सोनी यासारख्या नामवंत कंपन्यांबरोबर फडणवीस यांच्या बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत. जपानमधील बुलेट ट्रेन आणि टोकियो मेट्रो प्रकल्पांना भेटी देवून त्यांच्या कार्यपद्धतीचाही फडणवीस अभ्यास करणार आहेत. फडणवीस यांचा हा दौरा २५ ऑगस्टपर्यंत असून या कालावधीत अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ते वाकायामा या शहरालाही भेट देणार आहेत.