राज्यात महायुतीचे सरकार आल्यास रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांना उपमुख्यमंत्री पद देऊ अशी घोषणा भाजप नेते विनोद तावडे यांनी केली. शिवाजी पार्क येथील सभेत त्यांनी ही घोषणा केली.
  डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनी शिवाजी पार्क येथे सभा आयोजित करण्यात आली होती. त्या सभेला तावडे उपस्थित होते. आम्ही आठवलेंचा विश्वासघात करणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले.
 महायुतीची सत्ता आल्यास रामदास आठवलेंना नक्की उपमुख्यमंत्रीपद देऊ असे ते म्हणाले. आठवलेंना राज्यसभेवर जायचे आहे. महाराष्ट्रातून नाही जमलं तर बिहार किंवा मध्यप्रदेशातील भाजपाच्या जागेवरून त्यांना राज्यसभेवर पाठवले जाईल असे आश्वासनही तावडे यांनी यावेळी दिले.

Story img Loader