राज्याच्या गृह खात्याकडून काही दिवसांपूर्वी सलमान खान, अजय देवगण आणि बिग बी अमिताभ बच्चन यांना वाय+ आणि एक्स दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती.  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याही सुरक्षेत वाढ करुन वाय+ दर्जाची सुरक्षा पुरविण्यात येणार असल्याचं सांगितलं होतं.

अमृता फडणवीस यांनी याबद्दल आता ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी “मला एका सामान्य मुंबईकराप्रमाणे जगायला आवडेल. वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी ताफ्यातील अग्रस्थानी असलेली गाडी न पुरविण्याची विनंती मी मुंबई पोलिसांना करत आहे. मुंबईतील वाहतूक कोंडी ही मनस्ताप देणारी आहे. परंतु, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमधील प्रोजेक्टमधून यावर नक्की मार्ग निघेल”, असं म्हटलं आहे.

हेही वाचा >> Video : RIP लॉजिक!, हिरोला वाचवण्यासाठी पतंगाला लटकली नायिका, मालिकेतील व्हिडीओ व्हायरल

हेही वाचा >> ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेता झळकणार मराठी चित्रपटात, पोस्ट शेअर करत म्हणाला…

अमृता फडणवीसांना वाय+ दर्जाची सुरक्षा पुरविण्यात येणार असल्याचं समजल्यानंतर त्याबद्दल चर्चा सुरू झाल्या होत्या. देवेंद्र फडणवीसांनी ‘इंडियन एक्सप्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत याबद्दल खुलासा केला होता. “अमृता फडणवीसांनी सुरक्षा पुरविण्यासाठी कोणताही अर्ज केलेला नाही. त्यांना असलेला धोका लक्षात घेता त्यांना सुरक्षा पुरविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  अमृताने ताफ्यातील अग्रस्थानी असलेली गाडी न पुरविण्याची विनंतीही मुंबई पोलिसांना केली आहे”, असे ते म्हणाले होते.

हेही पाहा >> Photos : देवेंद्र फडणवीसांना जितेंद्र जोशीच्या ‘गोदावरी’ची भूरळ, म्हणाले “हा चित्रपट …”

अमृता या पेशॉने बॅंकर असून एक उत्तम गायिकाही आहेत. आजवर अनेक गाण्यांनी त्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. नुकतंच दिवाळीत त्यांचं नवीन गाणं प्रदर्शित झालं.  

Story img Loader