मुळशी (जि.पुणे) येथील कूळ कायदा विभागातील उपजिल्हाधिकारी डॉ. किरण महाजनला लाच घेताना अटक झाल्याने निलंबित केले जाईल, अशी घोषणा गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी विधानपरिषदेत केली.
महाजन आणि त्याचा लिपीक राजेश रणदिवे यांना १२ सप्टेंबर २०१२ रोजी लाच घेताना अटक झाली होती. पण लिपिकाला ४८ तासांहून अधिक काळ तुरुंगात रहावे लागल्याने तो निलंबित झाला. पण मुख्य सूत्रधार महाजनला लगेच जामीन मिळाल्याने तांत्रिक कारणास्तव निलंबित करता आले नाही. त्याच्या घराच्या झडतीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला एक कोटी ९५ लाख रुपयांची मालमत्ता मिळाली. पण कनिष्ठावर कारवाई आणि वरिष्ठ अधिकारी मोकाट असे चित्र असल्याचा मुद्दा जयंत पाटील यांनी उपस्थित केला.
त्यामुळे महाजनलाही निलंबित करण्याचे आदेश दिले जातील, असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपल्याशी बोलताना स्पष्ट केले असून त्यांच्यावतीने आपण घोषणा करीत असल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितले.
लाचखोर उपजिल्हाधिकारी डॉ. किरण महाजन याला निलंबित करणार
मुळशी (जि.पुणे) येथील कूळ कायदा विभागातील उपजिल्हाधिकारी डॉ. किरण महाजनला लाच घेताना अटक झाल्याने निलंबित केले जाईल, अशी घोषणा गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी विधानपरिषदेत केली. महाजन आणि त्याचा लिपीक राजेश रणदिवे यांना १२ सप्टेंबर २०१२ रोजी लाच घेताना अटक झाली होती.
आणखी वाचा
First published on: 15-03-2013 at 04:07 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deputy collector dr kiran mahajan to be suspended in bribery case