विक्रीवर विभागात उपायुक्त असलेल्या दीपक संखे (५५) यांनी आपल्या पत्नीवर चाकूने हल्ला केला. बोरिवलीतल्या वझिरा नाका येथे गुरुवारी रात्री ही घटना घडली. हल्ल्यानंतर संखे फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. नालासोपाऱ्याच्या विक्रीकर कार्यालयात दीपक संखे विक्रीकर उपायुक्त म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या पत्नी शोभा (४३) या मंत्रालयात स्टेनोग्राफर आहेत. हे दोघेही पूर्वघटस्फोटित होते. दोघांनी लग्न केल्यानंतर वझिरा नाका येथे राहत होते. शोभा यांना पहिल्या पतीपासून १८ वर्षांची मुलगी आहे तर संखे यांना पहिल्या पत्नीपासून दोन मुले आहेत. या दोघांमध्ये कौटुंबिक कारणावरून वाद होता. त्यामुळे शोभा आईकडे राहत होत्या. मंगळवारी रात्री शोभा कामावरून घरी आल्या तेव्हा संखे घरी होते. त्यांनी मद्यपान केले होते. त्यांनी शोभा यांना शिवीगाळ करायला सुरुवात केली. घरात शोभा यांची १८ वर्षांची मुलगीसुद्धा होती. भांडण विकोपाला गेल्यावर संतप्त झालेल्या संखे यांनी स्वयंपाकघरात जाऊन चाकू घेतला आणि शोभा यांच्या हातावर वार केले. शोभा यांनी चाकू धरून ठेवला होता. त्यामुळे संखे यांनी हातोडा मारण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे शोभा जीव वाचविण्यासाठी मुलीसह बाहेर पडल्या. या हल्ल्यात शोभा यांच्या हाताच्या पंज्याला आणि दंडाला दुखापत झाली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा