डोंबिवली जिमखाना येथे बुधवारी दुपारी लावलेल्या एका सापळ्यात एका खाजगी सहाय्यकामार्फत पाच लाख रूपायांची लाच स्वीकारल्याप्रकरणी विक्रीकर उपायुक्त रमेश जैद यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली.
तक्रारदार इसमाच्या कंपनीवर या अधिकाऱ्याने ९८ लाख ४३ हजार ७५४ रूपये कर असल्याचे दाखवून तो कमी करण्यासाठी तसेच कारवाई टाळण्यासाठी ५० लाख रूपयांची मागणी केली. तडजोडीनंतर २० लाख रूपये देण्याचे ठरले. त्यातील पाच लाखांचा पहिला हप्ता घेण्यासाठी जैद याच्या वतीने आर्चिस विसारिया डोंबिवली जिमखान्यात असता त्याला अटक केली. त्यानंतर रमेश कैद यांसही कल्याण येथील विक्रीकर कार्यालयातून अटक करण्यात आली.  दुसऱ्या घटनेत उल्हासनगर येथील नगरसेविका माया चावला आणि तिचा पती हरेश चावला यांच्याविरूद्ध अनधिकृत बांधकाम वाचविण्यासाठी लाच घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.  

Story img Loader