मुंबई : शिवसेना आमदारांनी बंडाचा झेंडा फडकवल्याच्या घटनेला मंगळवारी एक वर्ष पूर्ण झाले. आमदारांच्या बंडखोरीच्या निषेधार्थ महाविकास आघाडीचे नेते आणि कार्यकर्त्यांनी मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी आंदोलन केले. काही ठिकाणी पोलिसांनी शिवसैनिकांची धरपकडही केली. मात्र माजी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या वरळी विधानसभा मतदारसंघात एक माजी केंद्रीय मंत्री, तीन आमदार आणि माजी महापौर असतानाही शुकशुकाट होता. त्यामुळे पक्षातील वरिष्ठ पातळीवरून पदाधिकाऱ्यांची कानउघाडणी करण्यात आली.

दरम्यान, विविध प्रकल्पांसाठी रस्ते खोदण्यात आले असून आंदोलनामुळे वाहतूक कोंडी होऊन नागरिकांना अधिक त्रास झाला असता. म्हणून आंदोलन केले नाही, पण आमच्या मनात बंडखोरांविरुद्ध राग खदखदत आहे, असा खुलासा स्थानिक नेत्यांनी केला.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेतील ४० आमदारांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली. त्यानंतरच्या काळात राज्यातील राजकारणात अनेक घडामोडी घडल्या. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले. भाजप आणि एकनाथ शिंदे यांनी मिळून राज्यात सरकार स्थापन केले. शिवसेनेत झालेल्या बंडाच्या घटनेला मंगळवारी एक वर्ष झाले. या घटनेच्या पाश्र्वभूमीवर मुंबईसह राज्यातील संवेदनशील भागात सोमवारी रात्रीपासूनच कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Sanjay Dina-Patil, disqualification,
संजय दीना-पाटील यांच्या खासदारकीला आव्हान, शपथपत्रात आईच्या नावाचा उल्लेख नसल्याने अपात्र ठरवण्याची मागणी
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
BJP prepares for election in Shinde group constituency in Khanapur politics news
खानापूरमध्ये शिंदे गटाच्या मतदारसंघात भाजपची कुरघोडी
NCP Ajit Pawar group focus on Mahendra Thorve Karjat Khalapur Assembly Constituency news
रायगडमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या आमदाराच्या मतदारसंघावर अजित पवार गटाचा डोळा
Argument in Bar in 2016 BJP MLA Krishna Khopdes son had surrendered
बारमध्ये वाद : नागपूर भाजपच्या ‘या’ आमदाराच्या पुत्राने केले होते आत्मसमर्पण
Dhule Eknath shinde shivsena marathi news
धुळ्यात शिंदे गटाच्या दोन जिल्हाप्रमुखांमधील वादाचा पक्षाला फटका
Rajendra Raut, Manoj Jarange patil ,
मनोज जरांगे यांच्या आंदोलनातून आघाडीला सत्तेत आणण्याचा डाव, आमदार राजेंद्र राऊत यांचा पुन्हा हल्ला
Vijay Wadettiwar, Congress MP, Chandrapur,
वडेट्टीवार यांना पराभूत करा, कॉंग्रेस खासदाराचे अप्रत्यक्ष आवाहन

मुंबईतील अनेक भागात निषेध आंदोलन करण्याचा प्रयत्न शिवसैनिक करीत होते. मात्र त्याचवेळी आदित्य ठाकरे यांच्या वरळी विधानसभा मतदारसंघात मात्र शुकशुकाट दिसत होता. शिवसेना शाखांबाहेर आंदोलनाबाबत फारशी उत्सुकता नव्हती. दुपारचे ४ वाजले तरीही वरळी परिसरात आंदोलनाचा मागमूस नव्हता. ही बाब पक्षातील वरिष्ठ पातळीवरील पदाधिकाऱ्यांच्या लक्षात येताच स्थानिक नेत्यांची कानउघाडणी करण्यात आली. त्यामुळे स्थानिक पदाधिकाऱ्यांनी वरळी नाक्यावरील शिवसेना शाखेत धाव घेतली. शिवसैनिकही जमा झाले. मात्र वरळी परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे पदाधिकारी द्विधा मन:स्थितीत होते. अखेर उपस्थित पत्रकारांशी संवाद साधून स्थानिक नेत्यांनी मनोमनी निषेध नोंदवला. आंदोलन करण्यात आले नसले, तरी आमच्या मनात बंडखोर आमदारांबद्दल प्रचंड राग आहे. त्यांचा आम्ही निषेध करतो, असे विधान परिषदेवरील आमदार सुनील शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना केले.