मंगल हनवते

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मुंबई : म्हाडा सोडतीच्या संपूर्ण प्रक्रियेतच बदल करण्यात येणार आहे. त्यानुसार यापुढे सोडतीची पूर्ण प्रक्रिया ऑनलाइन असेल. इच्छुकांना अर्ज भरतानाच आवश्यक ती सर्व कागदपत्रे ऑनलाइन जमा करावी लागणार आहेत. त्याशिवाय अर्ज भरताच येणार नाही. कागदपत्रांच्या छाननीत पात्र ठरणारेच सोडतीत समाविष्ट होऊ शकतील. महत्त्वाचे म्हणजे पात्रता आधीच निश्चित झाल्याने विजेत्यांना थेट देकार पत्र देण्यात येणार आहे. सोडत प्रक्रियेत अनेक महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले असून यामुळे भ्रष्टाचाराला आळा बसेल आणि नव्या पद्धतीमुळे सोडत १०० टक्के पारदर्शक होईल, दावा करण्यात येत आहे. यासंबंधीचा प्रस्ताव मुंबई मंडळाने म्हाडा प्राधिकरणाला सादर केला आहे.

म्हाडा सोडत आणि भ्रष्टाचार असे समीकरण असल्याची टीका सातत्याने होते. त्यामुळे म्हाडाने वेळोवेळी सोडत प्रक्रियेत बदल करून सोडत ऑनलाइन केली. मात्र यानंतरही भ्रष्टाचार सुरूच असून सोडतीनंतरची प्रक्रिया अनेक वर्षे संपत नसल्याचे निदर्शनास आले आहे. एखाद्याला घराचा ताबा देण्यासाठी १५-२० वर्षे लागत आहेत. प्रतीक्षायादी अद्याप कायम आहे. या सर्व बाबी लक्षात घेऊन म्हाडाने अखेर सोडतीची संपूर्ण प्रक्रियाच बदण्याचा निर्णय घेतल्याची माहिती म्हाडातील उच्च पदस्थ अधिकाऱ्याने दिली.

एकूणच आतापर्यंत सोडतीसाठी काही ठरावीक (पॅनकार्ड, आधारकार्ड) कागदपत्रे लागत होती आणि सोडतीनंतर विजेत्यांकडून उत्पन्नाचा दाखला, निवासाचा दाखला, आरक्षणानुसार जात प्रमाणपत्र इतर कागदपत्रे जमा करून घेत पात्रता निश्चित केली जात होती. पण आता मात्र अर्ज भरतानाच ही सर्व कागदपत्रे जमा करावी लागणार असून सोडतीआधीच पात्रता पूर्ण होणार आहे. त्यामुळे विजेते ठरल्यानंतर पुढे थेट देकार पत्र देऊन  विजेत्यांकडून घराची रक्कम भरून घेतली जाणार आहे. महत्त्वाचे म्हणजे ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन असणार आहे. त्यामुळे भ्रष्टाचाराला खीळ बसणार असून दलालांना कोणताही वाव नसेल, असा दावा म्हाडा अधिकाऱ्यांनी केला आहे.

आयआयटीमार्फत संगणकीय प्रणालीची चाचणी

नव्या सोडत प्रक्रियेसाठी म्हाडाकडून नवीन संगणकीय प्रणाली (सॉफ्टवेअर) तयार करण्यात येत आहे. या प्रणालीची चाचणी आयआयटीकडून केली जाणार आहे. अर्जदारांना सोप्या पद्धतीने अर्ज भरता यावा यादृष्टीने या प्रणालीची रचना असेल.

नवी प्रक्रिया..

  • आता सोडतपूर्व आणि सोडतीनंतरची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन. 
  •   प्रतीक्षा यादीच्या नावावर भ्रष्टाचार होत असल्याने यापुढे प्रतीक्षायादी नसेल.
  • आता सोडतीची जाहिरात ऑनलाइन प्रसिद्ध केली जाईल. यात सर्व तारखा नमूद असतील.
  • अर्ज भरण्यासाठी आरक्षित प्रवर्गानुसार आणि उत्पन्न गटानुसार कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहेत याची यादी असेल.
  • या यादीनुसार अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाल्यास इच्छुकांना सर्व कागदपत्रे स्कॅन करावी लागतील.
  • आवश्यक ती कागदपत्रे असतील तरच अर्ज भरता येईल.
  • सर्व कागदपत्रांसह अर्ज भरल्यानंतर मंडळाकडून कागदपत्रांची छाननी करण्यात येईल.
  • यात पात्र ठरणारा अर्जदारच पुढे सोडतीत सहभागी होऊ शकेल.