मुंबई : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गालगत भिवंडी तालुक्यातील ४६ गावांचा विकास आता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) माध्यमातून केला जाणार आहे. आमणे, आतकोली, भादाणे, भोईरगावसह ४६ गावांसाठी एमएसआरडीसीची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

७०१ किमी समृद्धी महामार्गाचा नागपूर ते इगतपुरी हा ६२५ किमीचा टप्पा सेवेत दाखल झाला आहे. येत्या काही महिन्यांत इगतपुरी ते आमणे हा उर्वरित ७५ किमीचा टप्पाही वाहतुकीसाठी खुला होईल. महामार्गालगतच्या गावांमध्ये विकासाची संधी निर्माण झाली असून त्यासाठी एमएसआरडीसीने १८ कृषी समृध्द नवनगरे विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. या दृष्टीने नियोजन सुरू असताना भिवंडी तालुक्यातील ४६ गावांच्या सर्वांगिण विकासाची संपूर्ण जबाबदारी सरकारने एमएसआरडीसीकडे सोपविली आहे. ४६ गावांसाठी एमएसआरडीसीची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्याचा शासन निर्णय सोमवारी प्रसिद्ध करण्यात आला.

CCTV, Thane district, Thane, Thane latest news,
ठाणे : जिल्ह्यातील सीसीटीव्हीची प्रतिक्षाच
Amitabh Bachchan And Rajesh Khanna
“आम्ही अमिताभ बच्चन यांना आणून राजेश खन्नाचे करिअर…
The developer for the Municipal Corporation project to withdraw the redevelopment of Kamathipura from MHADA
कामाठीपुराचा पुनर्विकास ‘म्हाडा’कडून काढून घेण्याच्या हालचाली; विशिष्ट विकासकाच्या आग्रहामुळे निर्णय?
Cleanliness of Pratapgad in view of the visit of the UNESCO team satara
‘युनेस्को’ पथकाच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर प्रतापगडची स्वच्छता
Food and Drug Administration seized 285 liters of adulterated milk in Mumbai news
मुंबईत २८५ लिटर भेसळयुक्त दूध जप्त; अन्न व औषध प्रशासनाची मालाडमध्ये कारवाई
BMC Clerk Recruitment 2024: Last Day to Apply for 1,846 Vacancies
BMC Clerk Recruitment 2024: मुंबई मनपाच्या लिपिक पदासाठीची ‘ही’ जाचक अट रद्द; पुन्हा भरती प्रक्रिया सुरू होणार
Fully equipped parking lot for goods vehicles in Sangli on 13 acres of land
सांगलीत मालमोटारीसाठी १३ एकर जागेवर सुसज्ज वाहनतळ
2603 contract posts will be filled for 93 health institutions in Maharashtra state Mumbai news
राज्यातील ९३ आरोग्य संस्थांसाठी २६०३ कंत्राटी पदे भरणार

हेही वाचा >>> सिंधुदुर्गात पंचतारांकित हॉटेल अन् पाण्याखाली बोट प्रकल्प ; पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांची घोषणा

यापूर्वी सहा गावांसाठी एमएसआरडीसीची नवनगर प्राधिकरण म्हणून नियुक्ती झाली होती. नवनगर प्राधिकरण म्हणून काम करताना एमएसआरडीसीला (पान ८ वर) (पान १ वरून) भूसंपादन करीत विकास साधणे आवश्यक होते. ही अडचणीची बाब लक्षात घेता एमएसआरडीसीने ४६ गावांसाठी विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. त्याच वेळी एमएसआरडीसीची सहा गावांसाठीची नवनगर प्राधिकरण म्हणून नियुक्ती रद्द करतानाच भिवंडीतील काही गावांच्या औद्याोगिक विकासासाठीची एमआयडीसीची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. एमआयडीसीची विशेष प्राधिकरण म्हणून नियुक्ती रद्द करत त्या जागी एमएसआरडीसीची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. एमआयडीसीची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून असलेली ही नियुक्ती ही आता शासन निर्णयानुसार रद्द झाली आहे. त्यामुळे आता भिवंडी तालुक्यातील समृद्धी महामार्गालगतच्या ४६ गावांचा विकास एमएसआरडीसीकडून साधला जाणार आहे.