हिंदू संघटनांकडून टीकेची झोड उठविण्यात आलेल्या आणि अभिनेता आमीर खान याची प्रमुख भूमिका असलेल्या ‘पीके’ या चित्रपटातील आक्षेपार्ह दृश्यांची चौकशी करण्यासाठी अतिरिक्त पोलीस महासंचालक देवेन भारती यांच्या नेतृत्त्वाखाली समिती नेमण्यात आल्याची माहिती गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी मंगळवारी दिली.
हिंदू देव-देवतांची खिल्ली उडविणारी दृश्ये असलेल्या ‘पीके’विरुद्ध बंजरंग दल, विहिंपच्या कार्यकर्त्यांचा रोष अधिकाधिक उफाळून आला असून, त्याची परिणती सोमवारी या चित्रपटाचे प्रदर्शन करणाऱ्या चित्रपटगृहांवरील हल्ल्यांत झाली. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी हातात लोखंडी सळ्या, लाठय़ा-काठय़ा घेऊन अहमदाबाद, भोपाळ आणि काश्मीरमधील चित्रपटगृहांवर हल्ला केला होता.
दरम्यान, या चित्रपटातील आक्षेपार्ह दृश्यांना हटविण्याची हिंदुत्ववादी संघटनांची मागणी सेन्सॉर बोर्डाने धूडकावून लावली आहे. सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्ष लीला सॅमसन यांनी ‘पीके’मध्ये कोणतेही दृश्य आक्षेपार्ह नसून, हा चित्रपट आता प्रदर्शित झाला आहे असे म्हटले. चित्रपटात आमीर खान शंकराची भूमिका करणाऱ्या कलाकाराचा पाठलाग करताना दिसतो. चित्रपटात धार्मिक गुरूंबद्दलही उपहासात्मक टीका करण्यात आली आहे, या प्रकारच्या दृष्यांमुळे हिंदु धर्मियांच्या भावना दुखावल्याचा दावा हिंदुत्ववादी संघटनांनी केला होता. या सर्व पार्श्वभूमीवर राम शिंदे यांनी ही समिती नेमली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा