भाजपाचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यावर सीबीआयने गुन्हा दाखल केल्याची जोरदार चर्चा आहे. यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आहे. याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्यावर फडणवीसांनी सीबीआयने कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही, असं सांगितलं. तसेच मागील काळात गिरीश महाजांवर सीआयडीकडे दाखल गुन्हा सीबीआयकडे देण्यात आल्याची माहिती दिली. ते मंगळवारी (२७ सप्टेंबर) मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “सीबीआयने गिरीश महाजनांवर कुठलाही गुन्हा दाखल केलेला नाही. मागच्या काळात सीआयडीकडे जो गुन्हा दाखल झाला होता तो आम्ही सीबीआयला हस्तांतरीत केला आहे. त्याच प्रकरणात मी एक पेन ड्राईव्ह दिला होता. त्या पेन ड्राईव्हमध्ये कशाप्रकारे खोट्या केसेस दाखल करायच्या याचा खुलासा केला होता. तसेच यामागे कोण आहेत तेही समोर आलं होतं.”

हेही वाचा : केवळ नौटंकी सुरू आहे, महाविकास आघाडीच्या काळात काहीच झालं नाही – फडणवीस

“हे सगळं प्रकरण आता सीबीआयकडे गेलं आहे. सीबीआय या प्रकरणाची चौकशी करत आहे. त्यामुळे गिरीश महाजन यांना जेलमध्ये टाकण्याचं षडयंत्र असेल, आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याचं षडयंत्र असेल या सर्व गोष्टींचा पेन ड्राईव्हच्या माध्यमातून खुलासा झाला होता. आता त्याची चौकशी सीबीआय करते आहे,” अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra fadnavis comment on cbi case against girish mahajan pbs