राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. आधी जूनमध्ये मंत्रिमंडळ विस्तार होईल, असा दावा शिंदे गटाच्या नेत्यांकडून करण्यात आला. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अनेकदा दिल्लीवाऱ्या झाल्या. मात्र, मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय लांबणीवरच पडला. आता स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार हे जाहीर केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “राज्याचे अनेक प्रश्न असतात. त्यासंदर्भात दिल्लीला जाऊन भेट घ्यावी लागते, त्याचा पाठपुरावा करावा लागतो. अनेकवेळा त्यासंदर्भातील बैठकाही असतात. आम्हाला मंत्रिमंडळ विस्तारही करायचा आहेच. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याबाबत निर्णय घेतीलच. मला वाटतं जुलै महिन्यात आम्ही विस्तार करू.”

“केंद्रातील मंत्रिमंडळ विस्तार आधी की राज्याचा?”

केंद्रातील मंत्रिमंडळ विस्तार आधी की राज्याचा? या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, “केंद्र आणि राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा आपआपसात काहीही संबंध नाही. केंद्राचा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार हे आम्हाला माहितीही नाही. आम्हाला राज्याच्या विस्तारात जास्त रस आहे.”

व्हिडीओ पाहा :

हेही वाचा : मंत्रीमंडळ विस्तार कधी होणार? संजय शिरसाट यांनी सांगितली तारीख; म्हणाले “येत्या २० ते…”

“केंद्रातील काही मंत्र्यांना काढणार यात तथ्य नाही”

“ज्या बातमी मिळाली नाही तो या मंत्र्यांना काढणार, त्या मंत्र्यांना घेणार अशी एक बातमी तयार करतो आणि सोडतो. अशा बातमीला कोणतीही विश्वासार्हता नाही. जुलै महिन्यात राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार होईल. इतर कुणी इतकं स्पष्टपणे बोलत नाही,” असंही देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra fadnavis comment on shinde fadnavis government cabinet expansion pbs